शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीशिवाय केले गर्भपात

By admin | Updated: August 22, 2014 00:53 IST

वर्षा देशपांडे : सांगलीत रुग्णालयासमोर निदर्शने

सांगली : येथील आंबेडकर रस्त्यावरील श्री मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलचे डॉ. अर्जुन पाटील व त्यांच्या पत्नी सुषमा पाटील यांनी १०७ महिलांचा केलेला गर्भपात हा खुनासारखा गंभीर गुन्हा असून, त्यांच्याकडून पुरावे नष्ट होण्याची भीती असल्याने तातडीने अटक करावी, अशी मागणी गर्भलिंगनिदान राष्ट्रीय मूल्यमापन समितीच्या सदस्या व महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. शासकीय दोन डॉक्टरांच्या परवानगीशिवाय पाटील दाम्पत्याने हे गर्भपात केले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.देशपांडे म्हणाल्या की, अर्जुन पाटील हे शासकीय रुग्णालयात सेवा करतात. तेथील अनेक औषधे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सापडली आहेत. काही औषधांची मुदत संपलेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यांनी गर्भधारणा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले आहे. पाटील दाम्पत्याने केलेले १०७ गर्भपात कधी व कसे केले? याचा उलगडा होणे गरजेचे आहे. गर्भपात केल्यानंतर अर्भक कुठे दफन केले? याचे रहस्य पोलिसांनी उलगडावे. अन्न व औषध प्रशासन विभागाने या हॉस्पिटलच्या परिसरातील औषध दुकानावर छापे टाकून औषधांची तपासणी करावी. गर्भपात करण्यासाठी शासकीय दोन डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागते. मात्र तसे या प्रकरणात घडले नाही. सर्व गर्भपात हे बेकायदेशीरपणे केले आहेत.दरम्यान, देशपांडे यांनी हॉस्पिटलसमोर निदर्शनेही केली. त्यांच्यासोबत शाहीन शेख, सुरेखा शेख, विद्या स्वामी, स्नेहा सुतार, रुक्साना काझी, अ‍ॅड. दत्तात्रय जाधव, अ‍ॅड. शैलाताई जाधव होते. शहर पोलीस ठाण्यासमोरही त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांकडून तपासाची माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचनाही देशपांडे यांनी केल्या. दरम्यान, पोलिसांनी डॉ. अर्जुन पाटील यांच्याकडे दिवसभर चौकशी केली. त्यांनी गर्भपात करण्यासाठी शासकीय मान्यता असल्याचे पुरावे सादर केले आहेत. (प्रतिनिधी)