मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी अभिजित शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:27 IST2021-03-17T04:27:56+5:302021-03-17T04:27:56+5:30

मिरज : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी मिरजेतील उद्योजक अभिजित शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे ...

Abhijit Shinde as the District President of Maratha Federation | मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी अभिजित शिंदे

मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी अभिजित शिंदे

मिरज : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी मिरजेतील उद्योजक अभिजित शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त चिटणीस दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय उपाध्यक्ष नानासाहेब मुळीक, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नेताजी सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शैलजा भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अभिजित शिंदे यांची निवड करण्यात आली.

अभिजित शिंदे यांचा मराठा आरक्षणासाठी चळवळीत व शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक उपक्रमांत सहभाग आहे. नेताजी सूर्यवंशी, अभिजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. महासंघाच्या सांगली जिल्हा सरचिटणीस किशोरकुमार धनवडे, विधी सल्लागारपदी ॲड. अरुण चंद, जिल्हा उपाध्यक्षपदी सतीश जाधव, जिल्हा महिला अध्यक्षपदी लीलाताई पाटील, मिरज तालुका अध्यक्षपदी विजय शिंदे, तासगाव तालुका अध्यक्षपदी भरत पाटील, मिरज शहर अध्यक्षपदी धनंजय हलकर-शिंदे, उपाध्यक्षपदी महेश दाभाडे यांची निवड करण्यात आली.

Web Title: Abhijit Shinde as the District President of Maratha Federation