शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राला परीक्षेला सोडायला निघाला अन् जीव गमावला; सांगलीवाडीत शिवशाहीच्या धडकेत तरुण ठार, मित्र गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:52 IST

हेल्मेट घातले असते तर..

सांगली : मित्राला स्टेनोच्या परीक्षेला सांगलीत सोडायला निघालेला साहिल अन्सार मुलाणी (वय २२, रा. नागठाणे, ता. पलूस) याच्या मोपेडला शिवशाहीने धडक दिल्यामुळे तो जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र प्रतीक अनिल साळुंखे (१९, रा. बुरूड गल्ली, यल्लमा चौक, इस्लामपूर) हा गंभीर जखमी झाला. सकाळी ८:००च्या सुमारास सांगलीवाडी टोलनाक्याजवळ फल्ले मंगल कार्यालयासमोर हा अपघात घडला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साहिल मुलाणी हा इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी. कॉम.ला शिकत होता. प्रतीक साळुंखे हा याच महाविद्यालयात शिकत होता. दोघेही मित्र होते. बुधवारी सकाळी प्रतीक याची ‘स्टेनो’ची परीक्षा सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात होती. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे साहिलला बरोबर घेऊन जाण्याचे ठरवले.साहिल सकाळी नागठाणे येथून घरातून बाहेर पडला. वाळव्यात दुचाकी पार्क करून बसने तो इस्लामपूरला आला. साहिलने प्रतीकची मोपेड (एमएच. १०, ईडी. ४६९९) चालवण्यास घेतली. दोघेही इस्लामपूरहून सांगलीकडे येत होते. आठच्या सुमारास ते सांगलीवाडी टोलनाक्याजवळ आले. याचवेळी बायपासवरून सांगली-पुणे शिवशाही बस (एमएच. ०९, ईएम. १४७९) निघाली होती. टोलनाक्यापुढे चौकात शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.या धडकेने मोपेडचा पुढचा भाग तुटून चक्काचूर झाला. साहिलच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. पाठीमागे बसलेला प्रतीक गंभीर जखमी झाला. त्याला स्पेशल रेस्क्यू फोर्सने तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला भारती हॉस्पिटलमध्ये हलवले. अपघातानंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एकुलता एक आधार निखळलासाहिल हा नागठाणे येथे आई-वडिलांसह राहात होता. त्याचे वडील अन्सार मुलाणी हे हुतात्मा बझारच्या नागठाणे शाखेत व्यवस्थापक आहेत. मुलाणी दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूने दाम्पत्याचा एकुलता एक आधारच निखळला आहे.हेल्मेट घातले असते तर..साहिलने बुधवारी सकाळी लवकर सांगलीत मित्र प्रतीकला परीक्षेला सोडायला जाणार असल्याचे सांगितले होते. वडील अन्सार यांनी त्याला ‘हेल्मेट’ घेऊन जाण्यास सांगितले. परंतु, तो गडबडीत विना हेल्मेट इस्लामपूरला गेला. तेथे प्रतीकच्या वडिलांची मोपेड घेऊन सांगलीकडे येताना प्रतीकच्या वडिलांनीही दोघांना हेल्मेट घेण्यास सुचवले. परंतु, हेल्मेट घेणे त्यांनी टाळले. हेल्मेट असते तर जीव वाचला असता अशी चर्चा त्याच्या मित्रांमध्ये सुरू होती.