शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक देवघेवीच्या वादातून तरुणाचा खून, सांगलीतील घोगाव येथे आढळला होता मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 17:27 IST

संशयिताला अवघ्या चार तासांत केले जेरबंद

सांगली / कुंडल : घोगाव (ता. पलूस) येथील रेल्वे फाटकाजवळ मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाचा आर्थिक देवघेवीच्या वादातून खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. संतोष उमेश गाडवे (वय ४२, रा. कवठेपिरान, ता. मिरज) असे मृताचे नाव असून, श्रीहरी रवींद्र वडगावे (२२, रा. पेठभाग, कवठेपिरान) या संशयिताला अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा तपास करत वडगावे याला जेरबंद केले.मंगळवार, दि. २४ रोजी रात्री पावणेअकराच्यासुमारास घोगाव येथील रेल्वे फाटकासमोर पिकअप शेडमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. डोक्याला गंभीर जखम झालेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने संशय बळावला होता. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. एलसीबीच्या पथकाला मृतदेह आढळलेल्या ठिकाणापासून जवळच एक दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. या दुचाकीची माहिती घेतली असता, ती कवठेपिरान येथील संतोष गाडवे याची असल्याचे समोर आले. गाडवेबाबत अधिक माहिती पोलिसांनी घेतली, त्यात संतोष गाडवे व त्याचा मित्र श्रीहरी वडगावे हे दोघे सकाळपासून गावातून कोठेतरी गेल्याचे समजले. वडगावे हा कवठेपिरान येथील घरात असल्याचे पोलिसांना समजले. त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर एलसीबीच्या पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्याने खुनाची कबुली दिली. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन महाजन, संदीप नलवडे, सुनील जाधव, सागर टिंगरे, हेमंत ओमासे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस