शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील सोनी येथे तरुणाचा खून, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान खुनाच्या घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 19:43 IST

खुनाच्या या घटनेने गावात एकच खळबळ उडाली

सदानंद औंधेमिरज : सोनी तालुका मिरज येथे आज, मंगळवारी मध्यरात्री एका पैलवान तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून करण्यात आला. आकाश माणिक नरुटे (वय २२) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. खुनाच्या या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.सोनी गावात ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात असलेल्या आकाश यास दोघांनी बोलावून दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाश याचा मोबाइल बंद असल्याने त्याची शोधाशोध केली. यानंतर रात्री बारा वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आकाश याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. आकाश याच्या डोक्यात व पाठीवर धारदार हत्याराने अनेक वार केले होते.  भावासोबत शेती करणारा आकाश हा पैलवान होता. त्याचे काही दिवसापूर्वी गावातील काही जणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी  तिघांना  ताब्यात घेतले आहे. सोनीत ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीचे दिनकर पाटील विरुद्ध भाजपचे राजू माळी गटात लढत होत आहे. आकाश नरुटे हा राष्ट्रवादीचे दिनकर पाटील यांचा समर्थक होता.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस