शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या कार्यालयात घुसून तरुणाचा भोसकून खून, हल्लेखोरांचा शोध सुरु; सांगलीतील आरेवाडीतमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 16:13 IST

मृत मारुती हा पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांचा मुलगा आहे.

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा मंदिर देवस्थानच्या देणगी कार्यालयात घुसून मारुती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर (वय ३०, रा. आरेवाडी) या तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. मंदिरासमोर असलेल्या देणगी कार्यालयास आतून कडी लावत चौघा हल्लेखोरांनी मारुतीवर हल्ला केला. ही घटना मंगळवार, दि. २२ रोजी दुपारी अडीच वाजता घडली. मृत मारुती हा पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांचा मुलगा आहे.अनिल श्रीरंग कोळेकर (वय ३५), संजय श्रीरंग कोळेकर (३०), सोमनाथ श्रीरंग कोळेकर (२८) व बंडू दामाजी कोळेकर (२२, सर्व रा. आरेवाडी) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. घटनेनंतर सर्वजण पसार झाले आहेत.याबाबत कवठेमहांकाळ पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारमुळे आरेवाडीच्या बिरोबा मंदिर परिसरात गर्दी होती. बनात आलेला मारुती देवस्थान समितीच्या कार्यालयात येऊन बसला होता. त्यावेळी अनिल कोळेकर, संजय कोळेकर, सोमनाथ कोळेकर व बंडू कोळेकर हे चौघे तेथे आले. देणगी कार्यालयात शिरून त्यांनी आतून दाराची कडी लावून घेतली.

मारुतीला काही कळण्यापूर्वीच त्याच्यावर सपासप वार सुरू केले. पोटात खोलवर वार झाल्याने रक्तबंबाळ होऊन मारुती निपचित पडला. यानंतर चौघाही हल्लेखोरांनी देणगी कक्षातून बाहेर येऊन पलायन केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मारुतीला तत्काळ मिरजेच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. चौकशीदरम्यान चौघाही हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली. सर्व आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत. लवकरच त्यांना अटक करू. खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेनंतर आरेवाडी व बिरोबा मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस