शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत महाविद्यालयात घुसून तरुणावर खुनी हल्ला, कॉलेज कॉर्नर चौकात फाळकूट दादांची दादागिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 14:39 IST

तरुण गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला

सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातील एका महाविद्यालयात भावाला मारहाण केल्याचा राग मनात धरून एनएसएस खोलीत घुसून तरुणावर शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी अभिषेक अजित कांबळे (वय १९, रा. खोतवाडी, ता. मिरज) याने सुजित राम शिंदे (रा. शंभर फुटी रोड, झुलेलाल चौक, सांगली) व आदित्य खांडेकर (रा. गुंडेवाडी, ता. मिरज) या दोघांविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. कॉलेज कॉर्नर परिसरात अनेक महाविद्यालये असून, यातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या संशयिताच्या भावाला अभिषेक कांबळे याने मारहाण केली होती. याचा राग मनात धरून मंगळवारी दुपारी संशयित एकमेकांना महाविद्यालयात भिडले. याच दरम्यान संशयितांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या धारदार शस्त्राने कांबळे याच्यावर वार केले. यात कांबळे हा गंभीर जखमी झाला. कांबळे गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कॉलेज परिसरात एकच धावपळ उडाली होती. महाविद्यालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर विश्रामबाग पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक महाविद्यालयात दाखल झाले. विश्रामबागचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, विलास मुंडे, एलसीबीचे रूपेश होळकर, राेहित आदीच्या पथकाने पसार झालेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक केली. दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.कॉलेज कॉर्नर बनलाय अशांतशहरातील पाचहून अधिक महाविद्यालये एकत्र असलेल्या कॉलेज कॉर्नर चौकात आता फाळकूट दादांची चांगलीच दादागिरी सुरू असते. रस्त्यावर दुचाकी लावून एकमेकांकडे बघून शिवीगाळ, मुलींना अपशब्द वापरण्याचेही प्रकार वाढले आहेत. त्यातूनच थेट महाविद्यालयात घुसून खुनी हल्ल्याची घटना मंगळवारी घडली.

टॅग्स :Sangliसांगलीcollegeमहाविद्यालयCrime Newsगुन्हेगारी