शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: मोकाट गाढव दुचाकीच्या आडवे आले, अपघातात शिरोळचा तरुण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:52 IST

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.

सांगली : इनामधामणी रोडवर स्पोर्ट बाइक आणि कारच्या अपघातअपघातात रोहित सुनील खांडेकर (वय २१, रा. संभाजीनगर, शिरोळ) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी (दि. १७) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत रोहित खांडेकर हा आपल्या कुटुंबीयांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमध्ये राहत होता. सांगलीतील विजयनगर परिसरात असलेल्या एका ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करत होता. मंगळवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास रोहित हा त्याची स्पोर्ट बाइक (क्र. एमएच १०-डीसी ०६६५) वरून घरी जाण्यासाठी निघाला. १०० फुटी रोड, मैत्रीबन चौक ते इनामधामणी रस्त्यावरून तो निघाला असता, त्याच्या दुचाकीच्या आडवे अचानक एक गाढव आले. या गाढवाला धडक देऊन त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या कारला (क्र. एमएच ०९-एफजी ३७११) चालकाच्या बाजूला जोराची धडक दिली. या अपघातात रोहित हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे कर्मचारी तुषार पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अपघातातील दोनही वाहने ताब्यात घेतली असून, या घटनेची नोंद करण्याचे काम विश्रामबाग पोलिसात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Donkey collision leads to fatal bike accident in Sangli.

Web Summary : A young man from Shirol died instantly in an accident on Inam Dhamani Road, Sangli. His bike collided with a donkey, then a car, causing fatal head injuries. Police are investigating the incident, having seized both vehicles.