शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीच्या धडकेत शिराळ्याच्या तरुणाचा मृत्यू, कोल्हापुरात वनरक्षक पदाची परीक्षा देऊन परतताना झाला अपघात

By संतोष भिसे | Updated: February 26, 2024 16:51 IST

शिराळा : येथील विकर्ण नंदकुमार मस्कर (वय २३, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, शिराळा) या युवकाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू ...

शिराळा : येथील विकर्ण नंदकुमार मस्कर (वय २३, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, शिराळा) या युवकाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला. किणी वाठार (जि. कोल्हापूर) येथे रविवारी (दि. २५) हा अपघात झाला. कोल्हापूरात वनरक्षक पदाची शारीरिक चाचणी परीक्षा देऊन विकर्ण शिराळ्याकडे दुचाकीवरुन येत होता. त्यावेळी त्याला मोटारीने (एमएच १३ ईसी ३०६३) मागून जोराची धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकर्ण वनरक्षक पदाच्या लेखी परीक्षेत नुकताच उत्तीर्ण झाला होता. रविवारी सकाळी लवकर शारीरिक चाचणी परीक्षा होती. 

त्यामुळे दुचाकीवरून (एमएच १० सीई ६६५७) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरला गेला होता. परीक्षा देऊन परतताना अपघात झाला. मोटार कोल्हापूरहून भरधाव येत होती. तिच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विकर्णचा रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.मृतदेहावर सोमवारी पहाटे शिराळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी मोटार चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. विकर्णच्या पश्चात आई, चार बहिणी, चुलते, चुलती असा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू