शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार झाडावर आदळून मिरजेतील तरुण ठार, बेळगाव नजीक झाला अपघातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 13:35 IST

तर अनु राहील व बुरान काझी हे दोघे गंभीर जखमी झाले.

मिरज : बेळगाव (कर्नाटक) येथील वंटमुरी घाटाजवळ भरधाव मोटार रस्त्याकडेच्या झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात मिरजेतील सुलतान पीर काझी (वय २३ रा. शास्त्री चौक) हा तरुण जागीच ठार झाला. अपघातात मोटारीतील अनु राहील व बुरान काझी (दोघेही रा. मिरज) हे जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी हा अपघात झाला.मिरजेतून सुलतान काझी, अनु राहील व बुरान काझी हे तिघे मोटारीतून (क्र. एमएच १० डीजी ६५०७) बेळगावकडे जात होते. सुलतान काझी हा मोटार चालवत होता. दुपारी ३ वाजता बेळगावपासून दहा किलोमीटर अंतरावर काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालक सुलतान याचे नियंत्रण सुटल्याने मोटारी रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.जोरदार धडक बसल्याने मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात सुलतान काझी याचा जागीच मृत्यू झाला. तर अनु राहील व बुरान काझी हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मिरजेतून काझी याचे नातेवाईक बेळगावला रवाना झाले. काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात