शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: द्राक्षे विकणाऱ्या महिलेस भरधाव मोटारीने ठोकरले; जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 16:39 IST

जखमींवर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

कडेगाव : राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड-विटादरम्यान येवलेवाडी हद्दीत भरधाव माेटारीने धडक दिल्याने रस्त्याकडेला द्राक्ष विक्रीसाठी बसलेली महिला जागीच ठार झाली. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. शुभांगी विक्रम जाधव (वय ३५ रा. येवलेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात शुभांगी यांचे पती विक्रम कुंडलिक जाधव (३७), शरद महादेव जाधव (४१), मुकुंद हणमंत शेवाळे (३० सर्व रा. येवलेवाडी) जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. ८) घडली.याप्रकरणी माेटार चालक राजेंद्र उर्फ संभाजी रामचंद्र घार्गे (वय ५९ रा. उपाळे मायणी ता. कडेगाव) याच्याविरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येवलेवाडी येथील शुभांगी व विक्रम जाधव हे पती-पत्नी शेती तसेच रस्त्यालगत बसून द्राक्ष, वडापाव विक्रीचा व्यवसाय करत. बुधवारी नेहमीप्रमाणे शुभांगी व त्यांचे पती विक्रम हे कऱ्हाड-विटा या राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्याकडेला झाडाखाली बसून द्राक्षे विक्री करीत होते. द्राक्ष खरेदी करण्यासाठी शरद जाधव हे त्यांच्याजवळ उभे होते.

यादरम्यान संभाजी घार्गे  हे माेटार घेऊन (क्र एम.एच. १० सीएन ६९४१) कडेगावहून विट्याला निघाले होते. येवलेवाडी हद्दीत त्यांचा माेटारीवरील ताबा सुटल्याने माेटार थेट रस्त्याकडेला असलेल्या जाधव यांच्या द्राक्ष विक्रीच्या स्टॉलवर गेली. शुभांगी व विक्रम जाधव यांना माेटारीची जाेरदार धडक बसली. अपघातात शुभांगी यांचा मृत्यू झाला तर विक्रम जाधव व द्राक्ष खरेदी करण्यासाठी आलेले शरद जाधव हे गंभीर जखमी झाले. जखमींवर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी अजित भिकू जाधव (वय ३७) यांनी कडेगाव पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक संदीप साळुंखे करीत आहेत.दुचाकीस धडकद्राक्षांच्या स्टॉलला धडक देऊन माेटार तशीच पुढे जात समाेर निघालेल्या दुचाकीवर (क्र. एम.एच. १० डीएक्स ९३५९) आदळली. यामध्ये दुचाकीस्वार मुकुंद हणमंत शेवाळे गंभीर जखमी झाले. 

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू