शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका असल्याचे सांगत नवजात अर्भकाचे केलं अपहरण, पोलिसांनी सहा तासात लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 17:20 IST

‘वजन करण्यासाठी घेऊन जाते’ असे सांगून नवजात अर्भक हातात घेऊन निघून गेली. अर्धा तास झाला तरीही ती परतच आली नाही

अथणी : अथणी येथील शासकीय रुग्णालयातून परिचारिका असल्याचे भासवत महिलेने नवजात अर्भकाचे अपहरण केले. बुधवार दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. हा प्रकार उघडकीस येताच अथणी पोलिसांनी तत्काळ यंत्रणा राबवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या सहा तासांमध्ये अर्भकाची सुटका करुन त्यास मातेच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मालाश्री ऊर्फ ऐश्वर्या कांबळे (रा. म्हैसाळ ता. मिरज सध्या रा. अथणी) या महिलेस अटक करण्यात आली आहे.ऐनापूर येथील अंबिका भोई या प्रसूतीसाठी अथणीच्या शासकीय दाखल झाली होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता त्यांची प्रसूती होऊन मुलगा झाला. यानंतर काही वेळातच एक महिला आपण परिचारिका असल्याचे भासवत अंबिका यांच्याजवळ आली. ‘वजन करण्यासाठी घेऊन जाते ’ असे सांगून ती नवजात अर्भक हातात घेऊन निघून गेली.अर्धा तास झाला तरीही ती न परतल्याने अंबिका यांना संशय आला. त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यांचे पती अमित भोई यांनी अथणी पोलिसांना माहिती दिली. तत्काळ पथक रुग्णालयात धावले. यावेळी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्हीमध्ये एक महिला अर्भकासह निघून जाताना कैद झाली होती. या आधारे तपासाला गती देत पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये मालाश्री ऊर्फ ऐश्वर्या कांबळे हिला अर्भकासह म्हैसाळ येथून ताब्यात घेतले. बाळाची सुखरुप सुटका करुन त्यास मातेच्या स्वाधीन केले.जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील व कायदा व सुव्यवस्था उपमहासंचालक अलोक कुमार यांनी या कामगिरीबद्दल पथकास वीस हजार रुपये बक्षीस जाहीर केले. डीएसपी विश्वनाथ जलदे, रवींद्र नायकवडी, पीएसआय शंकर मुखर्जी, प्रवीण कुमार यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :SangliसांगलीKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस