शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

‘गॅरंटी’ कामाची, पैशांची नाही? ३६ कोटींच्या थकबाकीने प्रश्नचिन्ह; ‘मनरेगा’ योजना अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:38 IST

सार्वजनिक व वैयक्तिक कुशल निधी देताना शासनाकडून हात आखडताच

सांगली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (मनरेगा) ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची हमी देते. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण गरिबी कमी करणे, मजुरीच्या संधी निर्माण करणे आणि ग्रामीण विकासाला चालना देणे हा आहे. मात्र, सध्या या योजनेलाही निधी तुटवड्याचे चटके बसत आहेत. तब्बल ३६ कोटींचं देणं थकीत आहे. त्यामुळे ‘गॅरंटी’ कामाची असली तरी पैशांची नाही, असे म्हणण्याची वेळ कामे करणाऱ्यांवर आली आहे.रोजगार हमी योजना म्हटलं की, पूर्वी कामांसाठी बक्कळ निधी असायचा. पैशांची कधीही चणचण भासली नाही. मात्र, काही महिन्यांपासून याही योजनेला निधी तुटवड्याचे ग्रहण लागले आहे. २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत रोहयोच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामांचे जवळपास ३६ कोटी रुपये थकीत होते.जिल्हा यंत्रणेकडून या रकमेची मनरेगा आयुक्तांकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु, १०० टक्के रक्कम उपलब्ध होत नसल्याने ही योजना अडचणीत आली आहे. सततच्या पत्रव्यवहारानंतर काही निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, मागणीच्या तुलनेत तुटपुंजा निधी मिळत असल्याने स्थानिक यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. आजही शासनाकडे थोडथोडके नव्हे तर ३६ कोटी रुपये थकीत आहेत. हे सर्व चित्र पाहता, या योजनेची अवस्था ‘गॅरंटी कामाची, पैशांची नव्हे’, अशीच काहीशी झाली आहे.

किती रक्कम थकीत ?

  • अतिरिक्त सार्वजनिक कुशल मागणी : ५३१.८३ लाख
  • नियमित सार्वजनिक कुशल मागणी : ७६६.०२ लाख
  • वैयक्तिक कुशल मागणी : ५१०.१४ लाख
  • एकूण मागणी १८०८.१७ लाख

काय आहे योजनेचा उद्देश?ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची सुरक्षितता मिळावी तसेच स्थलांतर कमी व्हावे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हावी. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा. विशेषतः महिलांना आणि दुर्बल घटकांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.

अशी आहे थकबाकीजिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून सुरू असलेल्या मनरेगाच्या कामांसाठी कुशलचे १८ कोटी आणि अकुशलचे ५ कोटी रुपये थकीत आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही मनरेगाची कामे चालू आहेत. या कामांचे जवळपास १३ कोटी रुपये थकीत आहेत.

ग्रामपंचायत विभागाकडून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे केलेल्यांची बिले देण्यासाठी जवळपास १८ कोटी रुपये निधीची गरज आहे. मनरेगा आयुक्तांकडे या निधीची मागणी केली आहे. शासनाकडून निधी मिळताच रक्कम वितरित करण्यात येणार आहे. - शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद