शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मोटारींची काच फोडून रोकड लांबविणारा चोरटा जेरबंद, साडेसहा लाखांचा माल हस्तगत 

By शरद जाधव | Updated: May 5, 2023 18:29 IST

आंतरराज्य टोळीचा छडा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस

सांगली : सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकीच्या डिकी व मोटारींची काच फोडून रोकड लांबविणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मधू भास्कर जाला (वय २५, रा. कपरालतिप्पा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून साडेसहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. संशयित जाला याने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने या चोऱ्या केल्या आहेत.गेल्या आठवड्यात कर्मवीर चौकातील एका बँकेजवळ असलेल्या कोल्ड्रिंक दुकानापासून चोरट्यांनी गोपालदास हिरालाल मुंदडा यांची दोन लाख ९५ हजारांची रोकड दुचाकीची डिकी तोडून लांबविली होती. यानंतरही जिल्ह्यात अशाप्रकारे चोरीचे प्रकार घडले होते. त्यामुळे एलसीबीच्या वतीने याचा तपास सुरू होता.पोलिस पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित कुपवाड येथील हनुमाननगरमध्ये भाड्याने खोली घेऊन राहण्यास आहे. त्यानुसार पथकाने राहत असलेल्या खाेलीवर छापा मारून त्यास ताब्यात घेतले. परराज्यातील असूनही तो इथे कशासाठी राहत आहे हे त्याला सांगता आले नाही. पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत त्याने अखेर चोरीची कबुली दिली. यात दुचाकीच्या डिकीमधून आणि मोटारीची काच फोडून रोकड लंपास करत असल्याची कबुली त्याने दिली. घरातील झडतीमध्ये ६ लाख रुपयांची रोकड मिळून आली. तो व त्याचा साथीदार मिळून या चोऱ्या करत असल्याचे त्याने सांगितले. सापडलेली रक्कम ही वाटणीतील असल्याचेही त्याने सांगितले.पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, अनिल कोळेकर, संदीप पाटील, विक्रम खोत, जितेंद्र जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

या चोऱ्या आल्या उघडकीसविश्रामबाग येथील कर्मवार चौक, व्हाइट हाउस हॉटेलसमोरील चोरी, कवठेमहांकाळ तहसील कार्यालयाच्या आवार, आष्टा येथील प्राथमिक शिक्षक बँक, कोल्हापूर येथील ई-सेवा केंद्र व इचलकरंजी येथील वारणा बँकेजवळ झालेल्या चोरीचा छडा लावण्यात यश आले.व संशयित जाला हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने गुजरातमध्येही अशाच प्रकारे गुन्हे केले आहेत.

बँकेसमोर वॉच ठेवून डल्लासंशयित जाला व त्याचा साथीदार बँकेसमोर वॉच ठेवून चोरी करत होते. त्यांनी सावज हेरल्यानंतर ते पाठलाग करून अगदी नकळत पैशावर डल्ला मारत होते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस