शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

सांगलीच्या लेझीमचा ताल पंतप्रधान यांच्यासमोर, भारत मंडपम कार्यक्रमासह प्रजासत्ताकदिनी सादरीकरणाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:08 IST

२४ जणांचा संघ दिल्लीला रवाना

सांगली : सांगली शिक्षणसंस्थेच्या विश्वविक्रमी ‘लेझीम’चे सादरीकरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केले जाणार आहे. दिल्ली येथे २६ डिसेंबरला होणाऱ्या ‘भारत मंडपम’ कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर या लेझीम खेळाचे प्रदर्शन होणार आहे. सांगली शिक्षण संस्थेच्या १८ विद्यार्थिनी यात सहभागी होणार असून यामुळे सांगलीचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचणार आहे.शिक्षण संस्थेचे कार्यवाह शि. वा. गोसावी, संचालक विजय भिडे, माजी अध्यक्ष नितीन खाडिलकर, अमोल करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, या कार्यक्रमासह २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या परेडवेळीही सांगली शिक्षण संस्थेच्या ८० मुलींच्या संघास लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्याचा बहुमानही मिळाला आहे.वीर बाल दिवस सांस्कृतिक कार्यक्रमातंर्गत भारत मंडपम हा महोत्सव नवी दिल्लीत मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यासाठी क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली शिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातून लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. यासाठी संस्थेतील १६ मुली, एक संघप्रमुख, व्यवस्थापक, चार वादक असा २४ जणांचा संघ मंगळवारी दिल्लीला रवाना झाला आहे.भिडे म्हणाले, लेझीम हा एक खेळ आहे. शरीराच्या पायापासून ते केसापर्यंत व्यायाम होतो. करमणूकही होते. सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त २६ जानेवारी २०१२ मध्ये लेझीम खेळ प्रकारात साडेसात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विश्वविक्रम नोंदविला होता. या सोहळ्याचे हजारो सांगलीकर साक्षीदार होते. असा हा लेझीमचा खेळ दिल्लीत पतंप्रधान मोदी यांच्यासमोर व्हावा अशी इच्छा होती. ही संधी मिळाली आहे. यात संघप्रमुख हरिहर भिडे, वादक माया खटके, शंतनू ताम्हणकर, अथर्व कांबळे, बिंदुमाधव शिंदगी, व्यवस्थापक सचिन गद्रे यांच्यासह विद्यार्थिनी श्रेया जोशी, निर्झरा माळी, ईश्वरी शिकलगार, कृतिका माने, वेदा कुलकर्णी, प्रीती चव्हाण, श्रुतिका चव्हाण, संस्कृती शिंगे, सिद्धी माळकर, श्रुती भांडवले, केतकी नांदवडषकेर, भार्गवी सगरे, पायल यमगर, साक्षी कुलकर्णी, भाग्यश्री माळी, हर्षदा शिंदे, अन्विता पाटील आदी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४prime ministerपंतप्रधानStudentविद्यार्थी