शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या विद्यार्थ्याची इस्लामपुरात गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 12:49 IST

स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी वास्तव्य

इस्लामपूर : नांदेड येथून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी इस्लामपुरात आलेल्या २८ वर्षीय युवकाने राहत्या खोलीमध्ये स्लॅबच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

अक्षय गोविंद राठोड (रा. नांदेड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो येथील एका स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अभ्यासासाठी आला होता. इतर तीन सहकाऱ्यांसमवेत तो शाहूनगर परिसरात वंजारी यांच्या खोलीमध्ये भाड्याने राहत होता.

दुपारी दीडच्या सुमारास जीवन रामचंद्र कस्तुरे (रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हा सहकारी खोलीवर आला. यावेळी खोलीच्या एका दरवाज्याला बाहेरून कुलूप होते. तर दुसरा दरवाजा आतून बंद होता. जीवन याने अक्षय याला हाका मारल्या. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जीवन याने खिडकी बाजुला करून पाहिले असता अक्षयने गळफास घेतल्याचे दिसले.

जीवन याने अन्य मित्रांच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अक्षय राठोड याच्या नातेवाईकांना माहिती देत त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. हवालदार शरद बावडेकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस