शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

जुनी पुस्तके खरेदीच्या बहाण्याने मिरजेतील विद्यार्थिनीस दहा हजारांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:54 IST

मिरज : जुनी पुस्तके खरेदीच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने मिरजेतील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला १० हजाराला ऑनलाइन गंडा घातला. याबाबत पोलिसात तक्रार ...

मिरज : जुनी पुस्तके खरेदीच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने मिरजेतील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला १० हजाराला ऑनलाइन गंडा घातला. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  मिरजेतील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने जुना मोबाईल विकायचा आहे, अशी जाहिरात ॲपवर टाकल्यानंतर तिचा मोबाईल चांगल्या किमतीला विकला गेला. त्यानंतर तिने घरातील काही जुनी पुस्तके विक्रीची जाहिरात टाकली. त्यावर अज्ञात भामट्याने तिला फोन करून, ‘आमचे पुस्तकाचे दुकान आहे, माझी पत्नी तुमच्याकडे येऊन पुस्तके घेऊन जाईल’, असे सांगितले.  हिंदीत बोलणाऱ्या अज्ञाताने, ‘मी सैन्यात असून मिलिटरी अकाउंटवरून पैसे पाठविण्यासाठी तुम्ही आधी दोन हजार भरा. चार हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील’, असेही सांगितले. फोन पेवरून पुस्तकांची रक्कम पाठविण्यास सांगितल्याने मुलीने मैत्रिणीच्या फोन पेवरून दोन हजार पाठवले, मात्र ते पैसे पोहोचले नसल्याचा संदेश आला. त्यानंतर अज्ञाताने चार हजार व पुन्हा चार हजार रुपये पाठविण्यास सांगितले. दहा हजार रुपये पाठविल्यानंतरही रक्कम परत आली नाही.यावर त्याने ‘आणखी तीन हजार रुपये पाठवा. तुम्हाला पंधरा हजार परत मिळतील’, असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी