सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजना १०० टक्के सौरऊर्जेवर चालविण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे. म्हणूनच जर्मन बँकेच्या मदतीने कृष्णा खोरे महामंडळामार्फे संख (ता. जत) येथे एक हजार कोटी रुपये खर्च करून २०० हेक्टर जागेत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला केंद्र, राज्य शासनाने मंजूरी दिली असून, नोव्हेंबरमध्ये निविदा निघणार आहे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचा सर्वाधिक खर्च विद्युत बिलावरचा आहे. अनेकवेळा थकीत वीजबिलामुळे सिंचन योजना बंद ठेवाव्या लागल्या आहेत. वीजबिलाच्या खर्चातून सुटका करण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हैसाळ उपसा सिंचन योजना १०० टक्के सौरऊर्जेवर चाविण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे.
त्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील साखरी येथील सौरऊर्जा प्रकल्पांची पाहणी केली. त्या ठिकाणी तीन प्रकल्प सुरू आहेत. त्या धर्तीवर, मात्र त्याहून मोठा प्रकल्प संख येथे उभारला जाणार आहे. त्यासाठी संख तलावाजवळील प्रकल्पाच्या जागेतीली अतिक्रमणे हटविली आहेत. येथील काम सुरू करण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाकडून हालचाली सुरू आहेत. निविदा काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.
पंचवीस वर्षे पूर्ण क्षमतेने प्रकल्प चालणारसंख येथील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्प २५ वर्षे पूर्ण क्षमतेने चालेल, नंतर त्याची क्षमता ७५ टक्क्यांवर येईल. म्हैसाळ योजनेचे पंप या ऊर्जेवर चालवले जातील. त्यासाठी पंप हाऊसमध्ये काही बदल आवश्यक आहेत. त्याची क्षमताही वाढवली जाणार आहे. २५ वर्षांच्या काळात गुंतवणुकीच्या चौपटीने वसुली होईल, असे अपेक्षित आहे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सौरऊर्जेवर प्रकल्प सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना पाणीपट्टीही कमी आकारणी होणार आहे.
म्हैसाळ योजनेला ९६ मेगावॉट विजेची गरजजर्मन बँक आणि केंद्र सरकारच्या निधीतून सौरऊर्जा प्रकल्प होणार आहे. त्यादृष्टीने जर्मन बँक आणि कृष्णा खोरे महामंडळाने करारही झाला आहे. सध्या म्हैसाळ योजनेला ९६ मेगावॉट वीज लागते. सौरऊर्जेची वीजनिर्मिती रात्री होत नाही. त्यामुळे दुप्पट क्षमतेचा प्रकल्प उभारला जात आहे. पाणी आवर्तन काळ वगळता अन्य काळात ही वीज महावितरणला विकली जाईल. त्यातून ‘पाटबंधारे’ला उत्पन्नाचे साधन मिळेल. प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च त्यातून निघेल, असा अंदाज पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी व्यक्त केला.
२०२८ मध्ये साैरऊर्जा प्रकल्प कार्यान्वितपाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे म्हणाले, संख येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम जानेवारीपासून सुरू होईल. येत्या दीड वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. जून २०२८ मध्ये म्हैसाळ योजनेचे आवर्तन सौरऊर्जेवर चालू होऊ शकते.
असा आहे सौरऊर्जा प्रकल्प
- संख येथील २०० हेक्टर जागेत सौरऊर्जा प्रकल्प होणार
- सौरऊर्जा प्रकल्प खर्च : १००० कोटी रुपये
- म्हैसाळ योजनेच्या पंप हाऊसमध्ये बदल करणे : ३५० कोटी रुपये
- सौरऊर्जा प्रकल्पातून २०० मेगावॉट विजेची निर्मिती
- म्हैसाळ योजनेचे पहिले पाच टप्पे आणि विस्तारित योजनेचे दोन टप्पे सौरऊर्जेवर चालणार.
Web Summary : Sangli's Maisal irrigation scheme will run on solar power. A ₹1000-crore, 200-hectare solar project is planned with German bank support. Tenders are expected in November, aiming for a 2028 launch.
Web Summary : सांगली की म्हैसाल सिंचाई योजना सौर ऊर्जा से चलेगी। जर्मन बैंक के समर्थन से ₹1000 करोड़ का, 200 हेक्टेयर का सौर ऊर्जा प्रोजेक्ट प्रस्तावित है। नवंबर में टेंडर अपेक्षित हैं, जिसका लक्ष्य 2028 में शुरुआत करना है।