शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याने चिमटा काढला, चुलत्याने इशाराच दिला; रोहित पवार-अजित पवारांमध्ये रंगला कलगीतुरा, काय म्हणाले.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:21 IST

'..त्यामुळे लागेल तेवढे मागा दिले जाईल'

इस्लामपूर : शहरातील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात आज, शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये कलगी तुरा रंगला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची हसून पुरेवाट झाली. दादा आता गावकीचा विचार करतात. ते भावकीला विसरलेत असा चिमटा रोहित पवार यांनी काढल्यावर अजित पवार यांनी भावकीकडे लक्ष दिल्यानेच तू आमदार झालास ते टपाली मतावर असा प्रति चिमटा काढत नेहमीच्या स्टाईलने माझ्या नादाला लागू नका असा इशारा दिला.महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि एन.डी.पाटील बहुउद्देशीय सभागृहाचे भूमीपूजन असा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार जयंत पाटील, रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ज्येष्ठ भगिनी सरोजमाई पाटील यांनी या दिग्गज नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणले. त्यांच्यासमोरच  पवार काका-पुतण्यामध्ये वाक् युध्द रंगले.लाख कोटींच्या तिजोरीचा मालक इंथे बसलायरोहित पवार यांनी ४० लाखांची देणगी जाहीर करत यावर चंद्रकांतदादा एक शून्य तर अजितदादा दोन शून्य वाढवतील अशी कोटी केली. त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादा म्हणाले, एक-दोन शून्यांनी काय होणार त्यापेक्षा अजितदादाकडे पाहत आठ लाख कोटींच्या तिजोरीचा मालक इंथे बसलाय. त्यामुळे लागेल तेवढे मागा दिले जाईल, असे सांगताना आम्ही तुमच्यासारखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही असा टोला रोहित पवार यांना मारला.तुमच्या सारख्याच खडतर परिस्थितीमधून पुढे आलोहाच धागा पकडत अजित पवार यांनी आम्ही सुध्दा तुमच्या सारख्याच खडतर परिस्थितीमधून पुढे आलो आहोत असा चिमटा चंद्रकांतदादांना काढत रोहितच्या वेळेला परिस्थिती बदलल्याची मिष्किल टिपणी केली. या सगळ्यामध्ये मात्र आ.जयंत पाटील यांनी सावध पवित्रा घेत काही कमी पडले तर आम्ही आहोतच असे सांगत प्रसंगावधान राखले.