शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘संपर्क क्रांती एक्स्प्रेस’चे सांगलीत जल्लोषी स्वागत; सांगलीतून दिल्लीपर्यंत जाणारी पहिली एक्स्प्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:40 IST

आठवड्यातून दोन दिवस ही गाडी सांगलीत थांबणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली

सांगली : प्रदीर्घ संघर्षानंतर सांगलीरेल्वे स्थानकाला लाभलेल्या चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेसचे बुधवारी सांगलीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. आठवड्यातून दोन दिवस ही गाडी सांगलीत थांबणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.संपर्क क्रांती एक्स्प्रेसचे सांगली स्थानकावर सायंकाळी ४:२० वाजता आगमन झाले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गाडीच्या स्वागतासाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील, भाजप नेत्या नीता केळकर, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. दिलीप पटवर्धन, सुकुमार पाटील, सांगली जिल्हा गुरुद्वारा समितीचे सदस्य रमिंदरसिंग चंडोक व गुरुद्वारा संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते.चंडीगड-यशवंतपूर (बंगळुरू) संपर्क क्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेसला सांगली स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. तसेच वास्को-द-गामा ते निजामुद्दीन एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडीत थांबा दिला आहे.सांगलीतून दिल्लीपर्यंत जाणारी पहिली एक्स्प्रेस गाडी क्र २२६८६ चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती प्रत्येक बुधवारी व रविवारी दुपारी ३:५२ वाजता सांगलीत येईल. तर गाडी क्र. २२६८५ यशवंतपूर-चंडीगड संपर्क क्रांती प्रत्येक गुरुवारी व रविवारी पहाटे सुमारे ३:३२ वाजता सांगलीत येईल. सांगली रेल्वे स्थानकापासून देशाची राजधानी दिल्लीपर्यंत जाणारी ही पहिली एक्स्प्रेस गाडी आहे. त्यामुळे या गाडीच्या स्वागतासाठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेdelhiदिल्ली