शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: निवृत्त पोलिसाची नदीत उडी घेऊन आत्महत्या, लाचप्रकरणी झाली होती सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 17:23 IST

लाच प्रकरणात न्यायालयाने कांबळे यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यामुळे ते निराश होते.

सांगली : लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावलेल्या निवृत्त पोलीस हवालदाराने गुरुवारी दुपारी अंकली (ता. मिरज) येथे कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. अशोक नामदेव कांबळे (वय ६४, रा. सांगली, मूळ भोसे, ता. मिरज) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून ते नैराश्यात होते.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१२ मध्ये तुंग (ता. मिरज) येथील लाकूड व्यापाऱ्याकडील कामगाराचा झाडे तोडताना खाली पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास असलेल्या कांबळे यांनी गुन्ह्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ जानेवारी २०१२ रोजी लाच स्वीकारताना सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातच कांबळे यांना रंगेहात पकडले होते. यानंतर कांबळे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करून त्यांची न्यायालयात सुनावणी सुरू होती.शनिवार, दि. १६ रोजी न्यायालयात लाचप्रकरणी कांबळे यांना दोषी धरून एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यामुळे ते निराश होते. यातूनच त्यांनी अंकली येथे पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पथकाने भेट देऊन पाहणी करत पोलिसांनी हेल्पलाईनच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू केली. जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शोध मोहिमेत अडचणी येत होत्या. शुक्रवारी सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता.

आत्महत्येपूर्वी मुलीला केला व्हिडिओ कॉल

गुरुवारी सकाळी कांबळे घरातून बाहेर पडले. दुपारी दोनच्या सुमारास अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावर आल्यानंतर त्यांनी तिथून त्यांच्या मुलीला व्हिडिओ कॉल केला आणि आत्महत्या करीत असल्याचे सांगत फोन बंद केला. यानंतर त्यांनी नदीत उडी घेतल्याची शक्यता आहे. पुलावर कांबळे यांचे चप्पल आढळले.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसCourtन्यायालयBribe Caseलाच प्रकरण