शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी, ठकसेनावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 14:11 IST

विटा : भारतीय डाक विभागात नोकरीसाठी दहावीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून डाक विभागाच्या नेवरी शाखेत डाकपालाची नोकरी मिळविल्याप्रकरणी प्रमोद ...

विटा : भारतीय डाक विभागात नोकरीसाठी दहावीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून डाक विभागाच्या नेवरी शाखेत डाकपालाची नोकरी मिळविल्याप्रकरणी प्रमोद कृष्णात आमणे (वय २९, रा. काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) या ठकसेनावर विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा डाक विभागाचे निरीक्षक सुरेश एकनाथ काकडे (मूळगाव रा. दमानीनगर, सोलापूर, सध्या रा. विटा) यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे.काळमवाडी येथील प्रमोद आमणे याने दि. २ मे २०२२ रोजी कडेगाव तालुक्यातील नेवरी डाक घर शाखेत सहायक डाकपाल या पदासाठी आॅनलाइन पद्धतीने आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज केला होता. त्या अर्जाच्या आधारे पडताळणी करून गुणांच्या आधारे त्याला डाक विभागाने नियुक्तिपत्र दिले होते. त्यानंतर तो दि. १ सप्टेंबर २०२२ ते ७ सप्टेंबर २०२३ पर्यंत विटा डाक विभागात कार्यरत होता.त्यापूर्वी त्याने सादर केलेले दहावीच्या शालांत परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र डाक विभागाने पडताळणीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडे दि. १४ सप्टेंबर २०२२ रोजी पाठविले होते. दि. २९ आॅक्टोबर २०२२ रोजी शिक्षण मंडळाने पडताळणी संदर्भात पत्र नं. केडीबी/बीआर.एन./२४२१ अन्वये संशयित प्रमोद कृष्णात आमणे याने सादर केलेले दहावीच्या शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानंतर संशयित आमणे याने दहावीचे खोटे व बनावट प्रमाणपत्र सादर करून डाकपाल पदाची नोकरी मिळवित शासनाची व डाक विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस