इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय नवविवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. सासूच्या उपचारासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावल्याने तिने हे पाऊल उचलले. याप्रकरणी सासरच्या पाचजणांविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त करण्यासह हुंडाबळीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अमृता ऋषीकेश गुरव असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. ११ महिन्यांपूर्वी तिचा ऋषीकेश गुरव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. याप्रकरणी वंदना अनिल कोले (रा. रेठरेहरणाक्ष) यांनी मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती ऋषीकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरे अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव (सर्व रा. इस्लामपूर) आणि पतीचा मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव (रा.वडणगे, जि. कोल्हापूर) अशा पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.छळाला कंटाळून अमृताने ३ ऑक्टोबरच्या सायंकाळी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर इस्लामपूर आणि कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. पोलिस अधिक तपास करत आहेत.मानसिक व शारीरिक जाचहाटलग्नानंतर कर्करोगाने त्रस्त असलेल्या सासूवर उपचार करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत या कारणावरून मृत अमृता हिला वरील पाचजणांकडून शिवीगाळ करत मानसिक व शारीरिक जाचहाट केला जात होता. तसेच तू आमच्या जातीची नाहीस. त्यामुळे घरातून निघून जा, असे वारंवार सांगत हिचा अपमान केला जात होता.
Web Summary : A 25-year-old newlywed in Sangli committed suicide due to relentless demands for dowry to fund her mother-in-law's treatment. Facing harassment and caste-based discrimination, she took her own life. Police have registered a case against five members of her husband's family for abetment to suicide and dowry death.
Web Summary : सांगली में एक 25 वर्षीय नवविवाहिता ने दहेज की लगातार मांगों से तंग आकर आत्महत्या कर ली। ससुराल वाले सास के इलाज के लिए पैसे मांग रहे थे। उत्पीड़न और जाति-आधारित भेदभाव से तंग आकर उसने यह कदम उठाया। पुलिस ने पति के परिवार के पांच सदस्यों के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने और दहेज हत्या का मामला दर्ज किया है।