शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: प्रवासी जीपच्या धडकेत दोन चिमुकल्यांसह आई ठार, हेल्मेटमुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचला

By घनशाम नवाथे | Updated: December 11, 2024 15:00 IST

तासगाव रस्त्यावर कवलापूरजवळ भीषण अपघात

सांगली : येथील तासगाव रस्त्यावर कवलापूर येथे भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिल्यामुळे तिघेजण ठार झाले. दिपाली विश्वास म्हारगुडे (वय २८), मुलगा सार्थक (वय ७), राजकुमार (वय ५,रा. आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. तर दुचाकीस्वार विश्वास दादासाहेब म्हारगुडे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर जीप चालक नितेश नाटेकर (रा. तासगाव) हा पसार झाला.अधिक माहिती अशी, विश्वास म्हारगुडे हा मुळचा तळेवाडी (ता. आटपाडी) येथील असून तो सांगलीत वास्तव्यास आहे. सांगली परिसरात तो हमालीचे काम करत होता. बुधवारी तळेवाडी येथे लग्नासाठी तो पत्नी दिपाली, मुले सार्थक, राजकुमार यांच्यासमवेत दुचाकी (एमएच १० एएच ८७३२) वरून निघाला होता. कवलापूर ते कुमठे फाटा दरम्यान समोरून आलेल्या काळी पिवळी प्रवासी जीपने विश्वास याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकी मोडून पडली. दुचाकीवर समोरच्या बाजूला वडिलासमोर बसलेल्या राजकुमार याच्या गळ्याला पत्रा कापून तो जागीच ठार झाला. दुसरा मुलगा राजकुमार आणि दिपाली यांच्या डोक्यात गंभीर मार लागून ते जागीच मृत झाले. तर दुचाकीस्वार विश्वास यालाही गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर रस्त्यावरील वाहन चालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतू समोरील चित्र अंगावर काटा आणणारे होते. तिघेजण जागीच ठार झाले होते. जखमी विश्वास यांना तत्काळ सिव्हीलमध्ये दाखल केले. अपघातानंतर जीप चालक तेथे न थांबता पसार झाला. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ धाव घेतली. अपघातस्थळी शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती. दोन भावंडासह आईचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून हळहळ व्यक्त होत होती.

हेल्मेटमुळे जीव वाचलाविश्वास म्हारगुडे याने हेल्मेट घातले होते. त्यामुळे जोरदार धडकेनंतर तो वाचला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. केवळ हेल्मेटमुळेच सुदैवाने त्यांचा जीव वाचल्याचे अपघातस्थळी दिसून आले.

बेदरकारपणा कारणीभूतकुमठेफाटा येथून सांगलीकडे भरधाव वेगाने येताना चालक बेदरकारपणे जीप चालवत होता. त्याने विरूद्ध दिशेला येऊन सरळ मार्गाने निघालेल्या दुचाकीला धडक दिली. परंतू धडकेत दोन कोवळे जीव आणि आई यांचा तडफडून मृत्यू झाला.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू