शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सात लाख रुपयांची खंडणीही उकळली

By शरद जाधव | Updated: February 1, 2023 23:14 IST

कोळी कार्यरत असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातच त्याच्यावर अत्याचार, खंडणी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सांगली : शहरातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. केवळ अत्याचारच नव्हे तर धाक दाखवून पीडितेकडून सात लाख रुपयांची खंडणीही उकळण्यात आली. स्वप्निल विश्वास कोळी (वय ३९, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे संशयित पोलिसाचे नाव आहे. कोळी कार्यरत असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातच त्याच्यावर अत्याचार, खंडणी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,अल्पवयीन पीडिता ही शहरातील एका उपनगरात राहण्यास आहे. जानेवारी २०२२ दरम्यान स्वरूप चित्रमंदिरानजीक एका वस्तीत एका महिलेकडे पीडिता राहण्यास होती. त्यावेळी संशयित कोळी याने पीडितेच्या घरात घुसत पीडितेचा विरोध धुडकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने अत्याचार केले.अत्याचार केल्यानंतर कोळी याने पीडितेकडून दोन लाख, तर पुन्हा वस्तीवर पोलिसांचा छापा पडणार होता, त्याची अगोदर माहिती दिल्याबद्दल पाच लाखांची मागणी करत पैसे घेतले होते.

पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खंडणी वसुलीचा प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत कारवाईला सुरुवात केल्याचे समजते.सध्या पीडिता ही एका बालसुधारगृहात असून तिचा यापूर्वीही जबाब घेण्यात आला होता. याशिवाय मंगळवारी पुन्हा पीडितेची फिर्याद घेऊन संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर कोळी याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक अजित टिके करीत आहेत.

कोळीला पोलिस कोठडी -बुधवारी कोळीला अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यास ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSangliसांगलीPoliceपोलिस