शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: एका मुलीशी थांबला होता बोलत, अपहरण करुन अल्पवयीन मुलास केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:11 IST

मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाने शेडचा दरवाजा तोडून स्वतःची सुटका करून घेतली आणि घरी परतला

इस्लामपूर : प्रेमसंबंधाच्या कारणातून एका १७ वर्षीय मुलास मुलीसोबत बोलत थांबलेल्या शाळेसमोरून दुचाकीवरून अपहरण करत जनावरांच्या शेडमध्ये कोंडून काठी आणि कुऱ्हाडीने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्याला शेडमध्ये कोंडून ठेवत मोबाइल काढून घेऊन हल्लेखोर निघून गेला. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला.या मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश पाटील (पूर्ण नाव आणि पत्ता नाही) याच्याविरुद्ध गंभीर दुखापत करण्यासह अपहरण, जबरी चोरी, ओलीस ठेवणे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अल्पवयीन मुलगा हा एका मुलीशी शाळेजवळ बोलत थांबला होता. ही बाब मुलीच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आल्यावर मुलीने तेथून लगत असणाऱ्या बोळातून पळ काढला. त्याचवेळी पळून जात असलेल्या या मुलास गणेश पाटील याने थांबवून दुचाकीवर घेतले. एका जनावरांच्या शेडवर नेले. त्यास शेडमध्ये कोंडून काठी आणि कुऱ्हाडीने डोक्यात, उजव्या खांद्यावर, पायावर, उजव्या हाताच्या कोपरावर आतील बाजूस आणि पाठीवर मारहाण करीत जखमी केले. त्याला शेडमध्येच कोंडून त्याच्याजवळ असलेला मोबाइल काढून घेऊन तेथून तो निघून गेला.मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाने शेडचा दरवाजा तोडून स्वतःची सुटका करून घेतली आणि घरी परतला. घडलेला प्रकार त्याने आई-वडिलांना सांगितला. सध्या त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातच पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. प्रभारी पोलिस उपअधीक्षक पद्मा कदम या पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस