शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीतील नोकरी सोडण्यास भाग पाडले, ४० तोळे सोने काढून घेतले; कोल्हापुरातील सासरच्या चौघांवर गुन्हा

By अविनाश कोळी | Updated: January 11, 2025 18:00 IST

इस्लामपूर : जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेचा कोल्हापुरातील सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली ...

इस्लामपूर : जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेचा कोल्हापुरातील सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. तक्रारीनुसार जर्मनीतील नोकरी सोडण्यास भाग पाडत लग्नात घातलेले ४० तोळे सोन्याचे दागिने सासरच्या लोकांनी काढून घेतले. आणखी वीस लाखाची मागणी करीत त्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली. हा प्रकार जून २०२१ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे.याबाबत विवाहिता मानसी नितीन देसाई (वय ३१, रा. अपूर्वानगर, पाचगाव रोड-कोल्हापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती नितीन सदाशिव देसाई, सासू मंगल सदाशिव देसाई, सासरे सदाशिव बाबुराव देसाई (तिघे रा. पाचगाव रोड, कोल्हापूर) आणि नणंद शीतल अमर पाटील (रा. हडपसर, पुणे) अशा चौघांविरुध्द कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली इस्लामपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ४ जून २०२१ रोजी नितीन देसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या पाचच दिवसांनी सासरच्या मंडळींनी दागिन्यांवरून छळ करण्यास सुरुवात केली. लग्नाची सुट्टी संपल्यानंतर विवाहिता जर्मनी येथील कंपनीमध्ये रुजू झाल्या होत्या. त्यावेळी सासू, सासरे व नवऱ्याने नोकरी सोडून कोल्हापुरात परत येण्यासाठी विवाहिवर दबाव आणत दमदाटी करून त्रास दिला. हा सर्व प्रकार फिर्यादीने आपल्या माहेरच्या लोकांना सांगितला होता. मात्र त्यांनी धीर दिला. जर्मनीतील नोकरीचा राजीनामा देऊन परतल्यानंतरही सासरच्या लोकांनी नोकरीतील पैसे आणि पगार पत्रकाची मागणी करत छळ सुरु केला. त्यानंतर पुणे येथे एका कंपनीत नोकरी करत असताना त्याठिकाणीही नणंद शीतलने अपमानास्पद वागणूक देत मानसिक त्रास दिला. पुणे येथील नोकरी सोडल्यानंतर विवाहिता पतीसोबत बेंगलोर येथे वास्तव्यास होती. त्याठिकाणीही नवरा किरकोळ कारणातून वाद घालत त्रास देत होता. गुंतवणूक करण्यासाठी २० लाखांची मागणी त्याने केली होती. काही दिवसांनी नवरा नितीन याने फिर्यादी विवाहितेस काही न सांगता बेंगलोर येथील राहत्या घरातील सामान घेऊन निघून गेला होता. वरील सर्व त्रास असह्य झाल्याने शेवटी विवाहितेने पोलिसात धाव घेतली. सहायक पोलिस उपनिरीक्षक बळीराम घुले अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस