शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने मजुराचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 11:45 IST

इस्लामपूर : इस्लामपूर-कामेरी रस्त्यावरील खंडागळे मळ्याजवळ ट्रॅक्टरला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील ऊसतोड मजूर ट्रॉलीला धडकून ठार झाला. यामध्ये ...

इस्लामपूर : इस्लामपूर-कामेरी रस्त्यावरील खंडागळे मळ्याजवळ ट्रॅक्टरला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील ऊसतोड मजूर ट्रॉलीला धडकून ठार झाला. यामध्ये ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले, तर दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात मंगळवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास घडला.सागर संभाजी तोरणे (रा. जांभुळणी, ता. माण, जि. सातारा) असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. तर कुसुम दादा गोरवे ही डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाली. अपघाताबाबत अर्जुन सत्यवान बोरवे (वय ३९, रा. वळई, ता. माण) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृत सागर तोरणे याच्याविरुद्ध अपघातात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरून महिलेस गंभीर जखमी केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ऊसतोड मजुरांची टोळी कामेरी परिसरात वास्तव्यास आहे. बाबा सीताराम नामदास हा आपला ट्रॅक्टर (क्र. एमएच ११-डीएच ३०८६) आणि त्याला दोन ट्रॉली जोडून त्यातून काही ऊसतोड मजुरांना घेऊन कामेरी हद्दीतील सूर्यकांत पाटील यांच्या शेतातील ऊसतोडणीसाठी निघाला होता.खंडागळे मळ्याजवळ सागर तोरणे हा कुसुम गोरवे यांना घेऊन दुचाकीवरून (क्र. एमएच ११-डीके १६२८) ट्रॅक्टरला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीचा धक्का लागल्याने सागर तोरणे हा खाली पडला. यामध्ये ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. तर कुसुम गोरवे ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू