शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Milkha Singh birth anniversary: ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग अन् शिराळ्यातील सुभेदार शेळके यांच्या मैत्रीचा सुवर्ण अध्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:23 IST

‘फ्लाइंग सिख’समवेत गाजवल्या स्पर्धा; तीन युद्धांत सक्रिय सहभाग

विकास शहाशिराळा : ‘फ्लाइंग सिख’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले महान भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांची आज ९६वी जयंती. पंजाबच्या या धावपटूचे शिराळा तालुक्याशी वेगळ्या अर्थाने घट्ट नाते जोडले गेले आहे. मिल्खा सिंग यांची शिराळ्यातील सुभेदार दिवंगत पांडुरंग यशवंत शेळके यांच्याशी असलेली दृढ, अविस्मरणीय मैत्री आजही स्थानिकांच्या मनात जिवंत आहे. दोघांची कारकीर्द भारतीय सैन्यातूनच सुरू झाली आणि दोघेही उत्कृष्ट धावपटू म्हणून नावाजले गेले.१९५८ मध्ये मेरठ येथे झालेल्या ऑलिम्पिक निवड चाचणीतील ॲथलेटिक्स स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी प्रथम क्रमांक, तर पांडुरंग शेळके यांनी तृतीय क्रमांक पटकावला होता. याच स्पर्धेनंतर दोघांची बटालियनमध्ये धावपटू म्हणून नियुक्ती झाली आणि चंडीगड ते शिराळा अशी मैत्रीची साखळी अधिक दृढ झाली. दोघांनीही सैन्यासाठी तसेच देशासाठी अनेक पदके जिंकत योगदान दिले. मेरठमध्ये शेळके यांनी पहिला क्रमांक मिळवला असता, तर त्यांच्या ऑलिम्पिक प्रवासाची दारेही उघडली असती, असे सहकाऱ्यांत आजही सांगितले जाते.मिल्खा सिंग यांनी १९५८च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटरमध्ये सुवर्णपदके जिंकली. १९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि अंतिम फेरीत पोहोचणारे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या धावत्या आयुष्याची गाथा ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटामुळे घराघरात पोहोचली. शिराळ्याचे सुपुत्र सुभेदार पांडुरंग शेळके यांनी ३८ वर्षे सैन्यसेवा केली. १९६२चे चीन युद्ध, १९६५ आणि १९७१ची भारत-पाक लढाई अशा तिन्ही युद्धांत त्यांनी शौर्याने सहभाग नोंदवला.

शिपाई ते सुभेदार शेळके यांचा प्रवास प्रेरणादायीशिपाई ते सुभेदार हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये त्यांनी खेळ प्रशिक्षक म्हणून शेकडो जवानांना मार्गदर्शन केले. निवृत्तीनंतर शिराळ्यात माजी सैनिक संघटनेची स्थापना करून त्यांनी सैनिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठे काम केले. एक प्रयोगशील शेतकरी म्हणूनही त्यांनी अनेक पुरस्कारांची कमाई केली. त्यांच्या सेवेला एस. एस. मेडल, रक्षा मेडल, समर सेवा स्टार, जी. एस. मेडल (मिझो हिल्स), पश्चिमी स्टार, संग्राम मेडल व स्वातंत्र्यदिनी पुरस्कार अशा बहुमोल सन्मानांनी गौरविण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Milkha Singh and Subedar Shelke's golden friendship remembered on anniversary.

Web Summary : Milkha Singh's bond with Subedar Shelke, a fellow athlete, began in the army. Their friendship flourished after a 1958 athletics meet. Both served the nation valiantly, with Shelke also a war veteran and awarded farmer.