शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

सांगलीतील आटपाडीत उत्तरेश्वर देवाची यात्रा, बाजारात आला ५० लाखांचा बकरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 20:57 IST

शेकडो शेतकरी दाखल : माडग्याळ जातीच्या मेंढी व बकऱ्याची आकरा लाख ते पन्नास लाखाची बोली

लक्ष्मण सरगरआटपाडी मध्ये भरलेली उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक शेळ्या मेंढ्याच्या यात्रेत तब्बल पन्नास लाख रुपयांच्या बकऱ्याची बोली लागली असून आतापर्यंत चाळीस लाख रुपयांना मागणी करण्यात आली आहे.माडग्याळ जातीच्या बकरे व मेंढीची आकरा लाखा पासून ते पन्नास लाख रुपयांची मागणी करण्यात येत आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त होत असणारा शेळ्या मेंढ्याचा बाजारामध्येसांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्हा सह परराज्यातील शेतकरी व व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात यात्रेत हजेरी लावली आहे.

कोरोनानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असल्याने शेतकरी पशुपालक व व्यापारी याचा उत्साह ओसांडून वाहत आहे.याचं बरोबर शेतकरी पशुपालक यांच्या शेळ्या,बोकड,मेंढी, बकरे यांना चांगला दर मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.तर अनेक जातिवंत बकरे व मेंढी यांची खरेदी विक्री चांगल्या बोलीने झाल्यास शेतकरी हलगीच्या निनादात आपला जोश व आनंद व्यक्त करत आहेत. कुंडलिक एरंडे रा. शिवने ता. सांगोला जि. सोलापूर यांचा 40 लाख रुपये किमतीचा बकरा माणदेशातील आटपाडी येथील उत्तरेश्वर देवस्थानच्या कार्तिक यात्रेनिमित्त सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. शुक्र ओढा परिसरात पौर्णिमे पासून यात्रेस प्रारंभ झाला आहे. 

आटपाडीचे ग्रामदैवत उतरेश्वर देवस्थान निमित्त शेळ्या मेंढ्यांचा बाजार 

यात्रेतील या बाजारात दहा हजाराहून  अधिक शेळ्या मेंढ्या खरेदी विक्रीसाठी आले आहेत.यात्रे मध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा या राज्यातून व्यापारी दलाल खरेदीसाठी आले आहेत. पाच हजारापासून 50 लाख रुपये किमती चे बकरे या यात्रेत विक्रीसाठी आले आहेत.ही यात्रा दहा दिवस चालत आहे दोन दिवस शेळ्या मेंढ्यांचा खरेदी विक्रीचा बाजार होत आहे . दोन दिवस चालणाऱ्या या शेळ्या मेंढ्याच्या बाजारात कोठावधी रुपयाची उलाढाल होत असते .पश्चिम महाराष्ट्रामध्ये माणदेशातील आटपाडी तालुक्यातील शनिवारचा आठवडा बाजार शेळ्या मेंढ्या साठी प्रसिद्ध आहे .सकाळी सहा वाजता सुरू होणारा बाजार अवघा चार तास चालतो या बाजारात   कोट्यावधीची उलाढाल होत असते.

माणदेशातील  माडग्याळ जातीच्या बकऱ्याच्या किमती दीड लाखापासून 74 लाखापर्यंत मेंढपाळ सांगत आहेत.या यात्रेत शेकडो वाहने शेळ्या मेंढ्यांची ने आण करत आहेत. हौशी मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन वाजत गाजत नाचत  गुलाल उधळत फटाक्याची आताशबाजी करत   मिरवणुका काढत आहेत. हलगीच्या वाद्याने यात्रा   घुमु लागली आहे. यात्रेनिमित्त विविध स्टॉल ओढा परिसरात उभारले जात आहेत.माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी यात्रा व्यवस्थित पार पडावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ,नगरपंचायत, आटपाडी व्यापारी संघटना ,मेंढपाळ, उत्तरेश्वर देवस्थान समिती यांची बैठक   घेऊन सोयी सुविधा यांचा आढावा घेत पुरवल्या आहेत.

पूर्वी यात्रा माणदेशातील खिलार जनावरासाठी प्रसिद्ध होती

गेली दहा वर्ष झाले दुष्काळी परिस्थितीमुळे जनावराचा बाजार मोडला आहे. मात्र शेळ्या मेंढ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. माणदेशातील डाळिंब, बोर, शेळ्या, मेंढ्या व जातिवंत खिलार जनावर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्व  यात्रेची सुरुवात आटपाडी कार्तिक महिन्यात पौर्णिमेपासून  भरणाऱ्या यात्रेपासूनच दरवर्षी होत असते. गेली दोन वर्ष कोरोनाच्या  परिस्थितीमुळे यात्रा भरल्या नाहीत.परिणामी शेळ्या मेंढ्यांच्या खरेदी विक्रीवर परिणाम झाला होता. परंतु यावर्षी मोठ्या उत्साहात व जोशात यात्रा शेतकरी व मेंढपाळ यांनी भरवली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFairजत्राMarketबाजार