शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पेटत्या चितेमधून शरीराचे काही भाग काढून नेत जादूटोण्याचा प्रकार, मांत्रिक फरार; सांगलीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 18:47 IST

पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेताच मांत्रिकांनी पळ काढला

तासगाव : तासगाव शहरात स्मशानभूमीत अंत्यविधी झालेल्या एका महिलेच्या शरीराचे काही भाग काढून नेत जादूटोणा करण्याचा अघोरी प्रकार घडला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून मांत्रिक फरार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. मात्र, महिलेच्या शरीराचे भाग काढण्यावेळी महिलेचे कुटुंबीय व मांत्रिक यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी मांत्रिकाने चाकू काढल्याची चर्चा आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तासगाव येथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आईचे सोमवारी आकस्मिक निधन झाले. तासगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अग्निसंस्कार झाले. अग्नी दिल्यानंतर काही मंडळी मयताचे पूर्ण शरीर जळेपर्यंत स्मशानभूमीतच थांबून होते. यावेळी तासगाव येथील एका व्यक्तीसोबत चार ते पाच मांत्रिक स्मशानभूमीत आले.ते आल्यानंतर त्यांनी मयत महिलेच्या पेटत्या चितेमधून त्या महिलेच्या शरीराचे काही अवयव शोधण्यास सुरुवात केली. यावेळी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तुम्ही कोण आहात व महिलेच्या शरीराचे काय अवयव तुम्ही शोधत आहात याबद्दल विचारणा केली.यावेळी मांत्रिक व ते कुटुंबीय यांच्यात बाचाबाची झाली. ही बाचाबाची झाल्यानंतर त्यातील एका मांत्रिकाने चाकू काढून एका ठिकाणी गप्प बसण्यास त्यांना सांगितले. या घटनेनंतर हादरलेल्या त्या मंडळींनी काही लोकांना व तासगाव पोलिसांना याची कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तासगाव स्मशानभूमीत धाव घेतली. यावेळी त्यांनी एका तरुणाला पकडले, तर त्यातील मांत्रिकांनी पळ काढला. तासगाव पोलिसांत रात्री उशिरा ताब्यात घेतलेल्या तरुणाची चौकशी करण्याचे काम चालू होते.त्यांनी काय उद्देशाने हा प्रकार केला, याचा तपास पोलिस करत असून पळालेल्या मांत्रिकांचाही शोध तासगाव पोलिस घेत आहेत. मात्र, तासगाव पोलिसांत रात्री उशिरा याची नोंद नव्हती.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस