शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हापुरातील वारकरी महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:50 IST

धडकेनंतर त्या सुमारे २० फूट फरफटत पुढे गेल्या व रस्त्यावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला

ढालगाव : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (नागज फाटा, ता. कवठेमहांकाळ) एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत वारकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव लता लक्ष्मण माने (वय ५५, रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे आहे.टाकळीवाडी येथील वारकरी दरवर्षीप्रमाणे दिंडीसोबत पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी पायी जात होती. गेल्या १७ वर्षांपासून लता माने या दिंडीत सहभागी होत्या. सोमवारी सायंकाळी दिंडी नागज येथे मुक्कामी थांबली होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने लता माने यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्या सुमारे २० फूट फरफटत पुढे गेल्या व रस्त्यावर आपटल्याने गंभीर जखमी झाल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे दिंडीतील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून, टाकळीवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृतदेह कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. घटनेची नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Woman Pilgrim Dies in Hit-and-Run Accident Near Sangli

Web Summary : A Kolhapur woman pilgrim, Lata Mane, died in a hit-and-run accident near Sangli on the Ratnagiri-Nagpur highway. She was part of a walking pilgrimage to Pandharpur. An unidentified vehicle struck her, causing fatal injuries. Police are investigating.