शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- भरधाव कारची समोरुन दुचाकीला धडक, दुचाकीवरील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 12:10 IST

अपघातानंतर माेटारीत असलेल्या चालक व अन्य दाेघा-तिघांनी घटनास्थळावरून पलायन केले

रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे शिराळा रस्त्यावर भरधाव माेटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तडवळे (ता. शिराळा) येथील तुषार भानुदास शेवडे (वय २७) व भानुदास गुंडा शेवडे (५५) हे पिता-पुत्र जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवार, दि. ०४ मार्च राेजी रात्री १० वाजता रेठरे धरण तलावाजवळील पोपट उगळे यांच्या घरासमोर घडला.याबाबत अधिक माहिती अशी, तडवळे येथील तुषार शेवडे व भानुदास शेवडे हे पिता-पुत्र तुजारपूर (ता. वाळवा) येथे यात्रेनिमित्ताने नातेवाईकांकडे जेवायला गेले होते. यात्रा करून रात्री दाेघेही दुचाकीवरून (क्र. एमएच १० व्ही ९५७६) गावाकडे परतत हाेते. रेठरे धरण येथील तलावाजवळच्या उतारावर शिराळ्याहून इस्लामपूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या माेटारीने (क्र. एमएच ५० यु ०६९३) त्यांना समाेरून जोरदार धडक दिली.अपघातात दुचाकीवरील तुषार व भानुदास शेवडे हे बाप-लेक सुमारे २० ते ३० फूट अंतरावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात उडून पडले. दाेघांच्याही डोक्यास व हाता-पायास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर माेटारीत असलेल्या चालक व अन्य दाेघा-तिघांनी घटनास्थळावरून पलायन केले. ते नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींंनी दिली. अपघाताची माहिती मिळताच मृत तुषार व भानुदास शेवडे यांचे नातेवाईक घटनास्थळी धावले. घटनास्थळी रेठरे धरण व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू