शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बाराव्याच्या विधीसाठी निघालेल्या चव्हाण कुटुंबावर काळाचा घाला, कार उलटून दोघे ठार; कवठेमहांकाळ तालुक्यात अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 12:29 IST

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ मोटार उलटून दाम्पत्य ठार, तर चौघे जखमी झाले. पृथ्वीराज दौलत चव्हाण ...

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ मोटार उलटून दाम्पत्य ठार, तर चौघे जखमी झाले. पृथ्वीराज दौलत चव्हाण (वय ५५) व प्रियंका पृथ्वीराज चव्हाण (५०, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत. सर्व अपघातग्रस्त बीड येथील नातेवाइकांच्या बाराव्याच्या विधीसाठी निघाले होते. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता हा अपघात घडला.विलास महादेव माने (५४), अनिता विलास माने (३८, दोघे रा. सांगली), विवेक चव्हाण (५०), विजया विवेक चव्हाण (४५, दोघे रा. ममदापूर, जि. बेळगाव) जखमी असून त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कसबे डिग्रज येथील चव्हाण दाम्पत्य, पृथ्वीराज चव्हाण यांचे साडू विलास माने व विवेक चव्हाण, दोन मेहुण्या अनिता माने व विजया चव्हाण असे सहा जण मोटारीतून (क्रमांक केए २३, एन ७०७४) बीड येथे नातेवाइकांच्या बाराव्याच्या विधीसाठी निघाले होते. 

मंगळवारी पहाटे त्यांची गाडी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठलवाडीजवळ पहाटे साडेपाच वाजता उलटली. ती तशीच ५० ते ६० मीटर घसरत गेली. यामध्ये प्रियंका चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण हे पती-पत्नी जागीच ठार झाले, तर माने आणि चव्हाण दाम्पत्य जखमी झाले. त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे.मृत पृथ्वीराज चव्हाण सर्वोदय साखर कारखान्यात कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात आई, मुलगा, विवाहित मुलगी, असा परिवार आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात