शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भोसेजवळील अपघातात बालकाचा मृत्यू, संतप्त जमावाने टेम्पोच्या काचा फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 16:20 IST

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावाजवळ तीन वाहनांच्या भीषण अपघातात वीटभट्टी मजुराच्या अमित जगन्नाथ पवार (वय १०, रा. ...

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावाजवळ तीन वाहनांच्या भीषण अपघातात वीटभट्टी मजुराच्या अमित जगन्नाथ पवार (वय १०, रा. गोपाळवस्ती सातारा) या दहा वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे संतप्त जमावाने टेम्पोच्या काचा फोडल्या.दहिवडी येथून वीटभट्टी मजुरांचे कुटुंब मालवाहतूक रिक्षातून प्रापंचिक साहित्य घेऊन आपल्या गावी जात होते. सोमवारी दुपारी एक वाजता भोसे फाटा येथे आल्यानंतर सोलापूरच्या दिशेकडून भोसे गावाकडे येणाऱ्या ट्रॅक्टर (क्र. एमएच १० डीव्ही ६८९) ला ओव्हरटेक करणाऱ्या मालवाहतूक रिक्षात पाच लहान मुले व पती, पत्नी हे ऊसतोड मजूर बसले होते. मालवाहतूक रिक्षा ओव्हरटेक करताना मागून आलेल्या पिकअप टेम्पो (एमएच ११ बीएल ६१६५) ने जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागून जोरात धडकली. रिक्षात पाठीमागील बाजूस बसलेला अमित जगन्नाथ पवार हा मुलगा रस्त्यावर पडला. यावेळी मागून आलेला पिकअप टेम्पो त्याच्या अंगावरून गेल्याने अमित याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात बालकाच्या मृत्यूमुळे संतप्त जमावाने टेम्पोच्या काचा फोडल्या. याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलिस व ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलिस करत आहेत. चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूने वीटभट्टी मजूर कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू