शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धावा, धावा, पत्नीवर बलात्कार होतोय!, हेल्पलाइनवर फोन येताच पोलिसांची धावपळ, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 12:44 IST

कोल्हापुरातील दाम्पत्यावर आटपाडी पोलिसांनी दाखल केला गुन्हा

आटपाडी : नागरिकांना संकटकाळात मदतीसाठी पोलिसांनी ११२ हेल्पलाइन सुरू केली आहे; पण तिचा दुरूपयोग करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या कोल्हापुरातील दाम्पत्यावर आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.बुधवारी (दि. २१) दुपारी दोन वाजता आटपाडी पोलिसांना हेल्पलाइनवरून एक संदेश मिळाला. रुक्मिणी नांदिवडेकर नामक महिला संकटात असून तिला मदतीची गरज आहे, असे सांगण्यात आले. तिचा मोबाइल क्रमांकही देण्यात आला. कर्मचारी डॉलर कोळेकर यांनी तातडीने या मोबाइलवर संपर्क केला. मोबाइलवर भागेश नांदिवडेकर नामक व्यक्तीने सांगितले की, शेटफळे (ता. आटपाडी) येथील नामदेव मोरे नामक व्यक्तीशी आमचा पैशांच्या देवघेवीचा जुना वाद आहे. तो मिटविण्यासाठी आम्ही पती- पत्नी जुनोनी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे आलो आहोत. यावेळी मोरे याने पत्नी रुक्मिणीवर बलात्काराची धमकी दिली आहे. त्यामुळे तातडीने मदत करावी.डॉलर कोळेकर यांनी आणखी विचारपूस केली असता, नांदिवडेकर दाम्पत्य जुनोनी येथे नसून कोल्हापुरातून बोलत असल्याचे स्पष्ट झाले. कोळेकर यांनी तशी कल्पना त्यांना दिली व जुनोनी सांगोला पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे तक्रार नोंदविण्याची सूचना केली. दरम्यान, रुक्मिणी यांनी काही वेळांनी पुन्हा ११२ हेल्पलाइनवर फोन केला. आम्ही शेटफळे येथे आलो असून मोरे यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचे सांगितले. हेल्पलाइनवरून पुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यात तसा संदेश देण्यात आला. त्यामुळे कोळेकर तातडीने शेटफळे येथे गेले; पण नांदिवडेकर दाम्पत्य तेथे नसल्याचे दिसून आले. त्यांच्याशी संपर्क केला असता कोल्हापुरातूनच फोन करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस यंत्रणेच्या आपत्कालीन मदत यंत्रणेचा गैरवापर करणे, पोलिसांना विनाकारण चुकीची महिती देऊन त्रास देणे, दिशाभूल करणे, मदतीच्या भूमिकेतील पोलिसांशी फोनवरून उद्धट भाषेत बोलणे याबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत. अधिक तपास पोलिस नाईक दादासाहेब ठोंबरे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी