शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

अजित पवार गटातील आमदारांची हत्तीवरुन मिरवणूक काढणं आलं अंगलट, वनविभागाकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:30 IST

संयोजक राहुल बलकवडे आणि हत्ती मालक तासगावच्या श्री गणपती पंचायतन ट्रस्टच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल

तासगाव (जि. सांगली) : पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांची २ फेब्रुवारी रोजी पिरंगुट (ता. मुळशी) परिसरात येथे हत्तीवरून मिरवणूक काढली होती. मात्र, त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वनविभागाने या मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे आणि हत्ती मालक तासगावच्या श्री गणपती पंचायतन ट्रस्टच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल राहुल बलकवडे यांनी ही मिरवणूक काढत पिरंगुट परिसरात पेढे वाटले. यासाठी तासगावच्या श्री गणपती पंचायतन ट्रस्टचा हत्ती आणला होता. या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची दखल घेत, पुणे जिल्ह्याचे मानद वन्य जीवरक्षक यांनी अधिक माहिती घेत आयोजकांवर गुन्हा दाखल केला.

देवस्थानचा हत्ती कोणत्याही कार्यक्रमासाठी जाणार असेल, तर सरकारच्या सर्व परवानग्या घेऊनच आम्ही तो हत्ती पाठवितो. त्यामुळे आम्ही कायदा मोडला नाही. मात्र, ज्या लोकांनी कार्यक्रम आयोजित केला होता, त्या ठिकाणी नियोजनात चूक राहिली असेल, तर त्याच्याशी आमचं काही देणं-घेणं नाही. - राजेंद्र पटवर्धन, अध्यक्ष, श्री गणपती पंचायतन ट्रस्ट, तासगाव.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभागMLAआमदार