शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात निवडणुकीसाठी पैसे वाटणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, रोहित पाटील गटाचे कार्यकर्ते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 18:07 IST

बदनामीसाठी षडयंत्र : रोहित पाटील

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटप होत असल्याचा प्रकार संजय पाटील समर्थकांनी चव्हाट्यावर आणला. रविवारी सायंकाळी तासगाव येथील साठेनगर भागात दिवाळीच्या फराळासोबत प्रत्येक कुटुंबामध्ये तीन हजार रुपयांच्या पाकिटाचे वाटप करण्यात येत होते. याप्रकरणी सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील व बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे संजय पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. रविवारी सायंकाळी तासगाव येथील साठेनगर भागात खंडू कदम व सचिन पाटील हे दोघे दिवाळीचा फराळ व प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पाकीट एका कुटुंबामध्ये देत होते. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर संजय पाटील समर्थक त्याठिकाणी गेले व त्यांनी पैसे वाटप करताना दोन्ही कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले. यावेळी खंडू कदम पळून जाण्यात यशस्वी झाला तर सचिन पाटील यांना पकडून कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात आणले.या घटनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. निवडणूक आयोगाचे शिवप्रसाद भिसे हे पथकासह घटनास्थळी आले. तोपर्यंत पैसे वाटप करणाऱ्यांना संजय पाटील समर्थकांनी तासगाव पोलिस ठाण्यात नेले होते. पोलिस ठाण्यात दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले.निवडणूक विभागातील शिवप्रसाद भिसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन पाटील व खंडू कदम या दोघांसह रोहित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार समजताच संजय पाटील यांनी तासगाव पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतली. पैसे वाटप प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पोलिस व निवडणूक विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. त्यानंतर आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनीही पोलिस ठाण्यामध्ये येऊन पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

बदनामीसाठी षडयंत्र : रोहित पाटीलतासगाव येथील पैसे वाटपाशी माझा काहीही संबंध नाही. दिवंगत आर. आर. पाटील यांनाही विरोधकांनी अशाचप्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची पोलिसांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मी मागणी केली असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळRohit Patilरोहित पाटिलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024