कवठेमहांकाळ : बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी येथे झालेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात एका प्रेक्षकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार संजय गजानन पवार (वय ५३, रा. विश्रामबाग, मिरज) यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार नामदेव पोपट पाटील (रा. बोरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.९ नोव्हेंबर रोजी सकाळी कोड्याचा माळ परिसरातील गट क्र. ७४६, ७४७ आणि ७४८ येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. मात्र, या शर्यतीत उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांनी दिलेल्या परवानगीतील अटी व शर्तींचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शर्यतीच्या मैदानाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक बॅरिकेटिंग न लावणे, तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरीच्या उपाययोजना न करणे, हा निष्काळजीपणा आयोजकांकडून करण्यात आला. परिणामी, शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात अंबाजी सेखु चव्हाण (वय ६०, रा. करांडेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या प्रेक्षकाचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे यात्रास्थळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, असे फिर्यादीत पवार यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आयोजक नामदेव पोपट पाटील यांच्याविरोधात अटींचा भंग, निष्काळजीपणा आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : A spectator died at a bullock cart race in Borgaon, Sangli. The organizer, Namdev Patil, was booked for negligence after violating permit conditions, including insufficient safety measures, leading to the tragic accident.
Web Summary : सांगली के बोरगांव में बैलगाड़ी दौड़ में एक दर्शक की मौत हो गई। अनुमति शर्तों के उल्लंघन और अपर्याप्त सुरक्षा उपायों के कारण आयोजक नामदेव पाटिल पर लापरवाही का मामला दर्ज किया गया।