शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: एक कोटींची फसवणूक, ईश्वरपूरच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:32 IST

शीतल पाटील व भागीदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार अर्ज केला

सांगली : शहरातील एका जागेचा व्यवहार पूर्ण करण्याची लेखी खात्री देऊन खरेदीपोटी एक कोटी रूपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी ईश्वरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक शहाजी राजाराम पाटील (रा. ईश्वरपूर) यांच्याविरूद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माजी नगरसेवक शीतल जिनगोंडा पाटील (वय ५८, रा. ताराई पार्क, चिंतामणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगलीतील महापालिका हद्दीतील सिटी सर्व्हे नं. ३९३/ १ मधील १.६५ आर. क्षेत्रफळ असलेली जागेपैकी १/३ हक्क हिश्शाची जागा माजी नगरसेवक शीतल पाटील यांनी स्वस्तीवास्तू डेव्हलपर्स एलएलपीतर्फे भागीदारीत घेण्याचे ठरवले होते. ही जागा ईश्वरपूरचे माजी नगरसेवक शहाजी पाटील यांनी त्यांना दाखवली होती. या जागेचा मालक आपणच आहे. तुम्हाला जमिनीचा व्यवहार पूर्ण करून देतो अशी लेखी खात्री देऊन मूळ मालकाशी केलेले करारपत्र दाखवून विश्वास संपादन केला. बाजारभावाप्रमाणे जागेची किंमत ५ कोटी ७३ लाख रूपये इतकी ठरली होती.शीतल पाटील यांनी शहाजी पाटील यांना दि. १६ सप्टेंबर २०२२, १७ सप्टेंबर २०२२ व दि. १९ सप्टेंबर २०२२ रोजी २५ लाख रूपये धनादेशाद्वारे दिले. तसेच रोख २५ लाख रूपये दिले. एक कोटी दिल्यानंतर खूष खरेदीपत्र नोंद करण्याचे ठरले. त्याप्रमाणे शहाजी पाटील यांनी स्टॅम्पपेपरवर सविस्तर खरेदीपूर्व करारपत्र माधवनगर येथे केले. हा करार नोटरी करण्यात आला. त्यावेळी साक्षीदार म्हणून अनंत मोहन जाधव (रा. पंचशीलनगर) व माजी जि.प. सदस्य शिवाजी डोंगरे यांनी स्वाक्षरी केली.करारपत्र झाल्यानंतर शीतल पाटील आणि भागीदारांनी कराराप्रमाणे व्यवहार पूर्ण करण्यासाठी शहाजी पाटील यांची भेट घेतली. परंतू त्यांनी मूळ मालकाकडून खरेदीपत्र करून देण्यास टाळाटाळ केली. तसेच इसारतपोटी घेतलेले एक कोटी रूपये परत दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शीतल पाटील यांनी तक्रार दिली. त्याची चौकशी होऊन अखेर गुरूवारी संजयनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

चौकशीनंतर गुन्हा दाखलशीतल पाटील व भागीदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची सखोल चाैकशी झाली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.