शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: गुन्ह्यात मदतीसाठी स्वीकारलेली लाच भोवली, आटपाडीचे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 16:13 IST

लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल

आटपाडी : एका युवकाला गुन्ह्यात मदत करतो, म्हणून स्वीकारलेली लाच आटपाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांना भावली आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी गोसावी यांचे निलंबन केले आहे.करगणी (ता. आटपाडी) येथील सागर बाबाजी जगदाळे या तरुणावर आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा खोटा असून खोटी फिर्याद देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या तरुणाने पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देत केली होती.दरम्यान, यावेळी पोलिस अधीक्षक तेली यांनी संबंधित तक्रारीबाबत आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनेकवेळा दाखल असलेल्या खोट्या गुन्हांबाबात कोणतीच कारवाई होत नसल्याने व गुन्हाबाबात पोलिस योग्य तपास करत नसल्याचा आरोप जगदाळे यांनी पोलिस प्रमुख यांच्याकडे केला होता.युवकावर दाखल असलेला गुन्हाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांच्याकडे होता. दरम्यान, या गुन्ह्याबाबत सागर जगदाळे यास मदत करतो म्हणून पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी पैसे घेतले होते. याबाबत सागर जगदाळे या तरुणाने पोलिस अधीक्षकांना १३ डिसेंबर रोजी अर्ज देत पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी माझ्यावर दाखल असलेल्या खोट्या गुन्हात मदत करतो म्हणून, लाच मागत ती पोलिस ठाण्यामध्येच स्वीकारल्याची तक्रार देत व्हिडीओ सादर केला होता.लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक व दाखल केलेल्या खोट्या फिर्यादी या आधारावर गुन्हा दाखल न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक गोसावी यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईने आटपाडी तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे.लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरलआटपाडी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी सागर जगदाळे या तरुणांकडून दाखल असलेल्या गुन्हामध्ये मदत करतो म्हणून, पोलिस ठाण्यामध्येच लाच स्वीकारलेचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. दरम्यान, याबाबत पोलिस ठाण्यात होत असणाऱ्या अनेक घटनांबाबत सुप्त चर्चांना ऊत आला होता.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी