शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: मिरजेतील बँक कर्मचाऱ्याचा खातेदारांना ८७ लाखांचा गंडा, संशयिताचे पलायन; खातेदार हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 11:17 IST

म्युच्युअल फंड व बँकेच्या विविध योजनांत पैसे गुंतविण्यास भाग पाडले

मिरज : मिरजेतील एका खाजगी बँकेतील कर्मचाऱ्याने खातेदारांना ८७ लाखांचा गंडा घालून पलायन केले. याबाबत फसवणूक झालेल्या खातेदारांनी व बँक व्यवस्थापनाने तोहिद अमीर शरीकमसलत (रा. मिरज) या बँक कर्मचाऱ्याविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.मिरजेतील ॲक्सिस बँकेत खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिद शरीकमसलत याने ओळखीच्या खातेदारांना म्युच्युअल फंड व बँकेच्या विविध योजनांत पैसे गुंतविण्यास भाग पाडले. त्यांच्या खात्यातील रक्कम मोबाइल बँकिंगद्धारे इतरांच्या खात्यात वळवून काढून घेतली. काही ओळखीच्या खातेदारांना, ‘ बँकेने खातेदारांसाठी आणलेल्या खास योजनेत तुमची एफडी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो’, असे सांगितले होते. काही जणांना, ‘माझ्या प्रमोशनसाठी काही महिन्यासाठी बँकेत ठेवी ठेवा’, अशी गळ घालून त्यांच्याकडून रक्कम घेतली. गणी गोदड या खातेदाराचा बँक खात्याशी संलग्न मोबाइल क्रमांक बदलून त्यांच्या खात्यातील रक्कम काहीजणांच्या खात्यात वळवून काढून घेतल्याची तक्रार आहे.सहा महिन्यात तोहिद शरीकमसलत याने अशा पद्धतीने १५ ते २० जणांना गंडा घातला असून यापैकी आठ जणांनी पोलिसात धाव घेतली आहे. याबाबत अमिना नजीर अहमद शेख (६ लाख), गणी गोदड (१२ लाख), हुसेन बेपारी (२३ लाख), शिराज कोतवाल (२३ लाख), वाहिद शरीकमसलत (११ लाख), मेहेबूब मुलाणी (२ लाख), रमेश सेवानी (१६ लाख), अनिल पाटील (२ लाख) या आठजणांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार केली आहे.तोहिद शरीकमसलत याने आणखी काही जणांना अशाच पद्धतीने गंडा घातल्याचा संशय असून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन तो बेपत्ता झाल्याने खातेदार हवालदिल झाले आहेत. तोहिद याने सरफराज बेग, ईबाज शरीकमसलत, जहांगीर रोपळे, जिब्रान सय्यद या चारजणांच्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर करुन तेथून रोखीने काढल्याचे निष्पन्न झाले आहे.याबाबत खातेदारांच्या तक्रारीमुळे ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक साजिद पटेल यांनीही तोहिद शरीकमसलत याच्याविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दिली आहे. तोहिद याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यांत येणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. फसवणुकीच्या तक्रारीबाबत चौकशी सुरु असून याबाबत फसवणूक झालेल्या सर्वांच्या तक्रारी आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यांत येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस