शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: बँक कर्मचाऱ्याने नऊ ग्राहकांना घातला ९० लाखांचा गंडा, मिरजेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 11:56 IST

संतप्त ग्राहक व बँक अधिकाऱ्यांचे वादावादीचे प्रकार

मिरज : मिरजेतील ॲक्सिस बँकेत ग्राहकांचे पैसे इतर खात्यांवर वळवून बँकेतील नऊ ग्राहकांना सुमारे ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकणी तोहिद बशीर शरिकमसलत (वय २७, रा. मिरज) या बँक कर्मचाऱ्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद याने ९० लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याची तक्रार बँक व्यवस्थापक साजिद पटेल यांनी पोलिसात दिली आहे.ॲक्सिस बँकेत नवीन ग्राहकांचे खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिद शरीकमसलत याने खातेदारांशी चांगली ओळख करत म्युच्युअल फंडसह बँकेच्या विविध योजनांत पैसे गुंतविण्यास सांगितले. त्याला नोकरीत बढती मिळण्यासाठी ठेवीची गरज असून, काही कालावधीसाठी बँकेत ठेवी ठेवा, असे सांगून त्याने अनेक ग्राहकांना गळ घातली. काही खातेदारांच्या बँक खात्यांचा मोबाइल क्रमांकही परस्पर बदलला. तोहिद शरिकमसलत याने इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यावरील रक्कम आपल्या मित्रांच्या चार वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग करून परस्पर काढून घेतली.याबाबत खातेदारांनी रकमेसाठी तगादा सुरू केल्यानंतर तोहिद याने मिरजेतून पलायन केले. त्यामुळे संतप्त ग्राहक व बँक अधिकाऱ्यांचे वादावादीचे प्रकार घडले. बँक ग्राहक अमिना नजीर अहमद शेख यांच्या खात्यावरील ६ लाख रुपये, गणी गोदाड यांचे १२ लाख, हुसेन बेपारी यांचे २३ लाख, शिराज कोतवाल यांचे २३ लाख, वाहिद शरीकमसलत यांचे ११ लाख, मेहेबूब मुलाणी यांचे २ लाख, रमेश सेवानी यांचे १६ लाख व अनिल पाटील यांचे २ लाख अशा नऊ खातेदारांच्या खात्यावरील ९० लाखांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याची तक्रार आहे. बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तोहिद शरिकमसलत याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस