जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९६९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:21+5:302021-06-30T04:18:21+5:30
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे नवे ९६९ रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्यातील १४ व परजिल्ह्यातील २ अशा १६ ...

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९६९ रुग्ण
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे नवे ९६९ रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्यातील १४ व परजिल्ह्यातील २ अशा १६ जणांचा मृत्यू झाला. ८०७ जणांनी कोरोनावर मात केली, तर उपचाराखालील ९४८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ - उतार होत आहे. मंगळवारी वाळवा तालुक्यात सर्वाधिक २५१ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात २२, जत २०, कडेगाव ७८, कवठेमहांकाळ १२, खानापूर ६६, मिरज १४६, पलूस ७५, शिराळा ४५, तासगाव ५९; तर महापालिका क्षेत्रात सांगलीत १६४, मिरजेत ३१ असे १९५ रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, मुंबई, रत्नागिरीतील २३ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील १४ जणांचा मृत्यू झाला. त्यात पलूस, जत, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी १, खानापूर २, वाळवा तालुक्यातील ६; तर महापालिका क्षेत्रात सांगलीत दोन व मिरजेत एक अशा तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील कोल्हापूर जिल्ह्यातील एक व कर्नाटकातील एक अशा दोन जणांचाही कोरोनाने बळी घेतला.
सध्या ९४८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, तर जिल्ह्यातील ८०७ व जिल्ह्याबाहेरील १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण आरटीपीसीआरच्या २,८४४ चाचण्यांत २०८ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या १०४५४ चाचण्यांत ७८४ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,४४,७९३
कोरोनामुक्त झालेले : १,३१,८३१
आतापर्यंतचे मृत्यू : ४,०५४
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : १६४
मिरज : ३१
आटपाडी : २२
जत : २०
कडेगाव : ७८
कवठेमहांकाळ : १२
खानापूर : ६६
मिरज : १४६
पलूस : ७५
शिराळा : ४५
तासगाव : ५९
वाळवा : २५१