जत तालुक्यात निराधारची ९१ प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:19+5:302020-12-12T04:42:19+5:30

जत : जत तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत ९१ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. सुजय शिंदे अध्यक्षस्थानी ...

91 cases of homelessness sanctioned in Jat taluka | जत तालुक्यात निराधारची ९१ प्रकरणे मंजूर

जत तालुक्यात निराधारची ९१ प्रकरणे मंजूर

जत : जत तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत ९१ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. सुजय शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.

संजय गांधी निराधार योजनेची पहिली बैठक शुक्रवारी झाली. यावेळी संजय गांधी योजनेतून ६३ व श्रावण बाळ योजनेतून २८, असे एकूण ९१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. आमदार विक्रम सावंत यांनी नूतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले. सदस्य राम पाटील, उत्तम चव्हाण, गणेश गिड्डे, विजय चव्हाण व तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार संजय पवार उपस्थित होते.

तालुक्यातील जास्तीत जास्त वंचित नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार सावंत यांनी यावेळी केले.

Web Title: 91 cases of homelessness sanctioned in Jat taluka