शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांना पोसण्यासाठीच ८७ हजार कोटींचा ‘शक्तिपीठ’; राजू शेट्टींचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 15:46 IST

सांगलीवाडीतील शेतकरी मेळाव्यात शक्तिपीठ महामार्ग रद्दचा ठराव

सांगली : शेतकरी, सामाजिक संघटनांची कोणतीही मागणी नसताना ८७ हजार कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्ग ठेकेदारांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर लादला आहे. या ठेकेदारांकडून बाँडच्या माध्यमातून राजकर्त्यांच्या घरात पैसे जाणार आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. दरम्यान, बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तिपीठ रद्द करा, असा ठराव शेतकऱ्यांनी मंजूर केला.सांगलीवाडीत शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते. यावेळी केंद्रीय माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, राज्य उपाध्यक्ष कॉ. उदय नारकर, सावकार मदनाईक, नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, केंद्र आणि राज्यातील भाजपप्रणीत सरकार हे भांडवलदारांचे आहे. शक्तिपीठ महामार्गाची मागणी नसताना केवळ ठेकेदारांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याचाच राजकर्त्यांचा हेतू आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या २०१३ मधील कायद्याची सरकारने ठेकेदाराच्या हितासाठी मोडतोड केली. महामार्गासाठी जमिनी घेण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिकाच जाणून घेतली जात नाही, असा हिटलरशाही कायदा केला आहे. यास काही प्रमाणात काँग्रेसचे तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरातसुद्धा जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २७ हजार एकर शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. असे काळे कायदे करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी संघटित उठाव केल्यास सरकार शक्तिपीठ महामार्ग करण्याचे धाडस करणार नाही. कायदा तुम्ही पाळणार नसाल तर आम्ही कायदा हातात घेऊन जमिनी घेण्यासाठी येणाऱ्यांचे पाय मोडले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.डॉ. उदय नारकर म्हणाले, शेतकरी, भक्तांची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नाही. फक्त ठेकेदारांच्या मागणीनुसार शक्तिपीठ करून राजकर्त्यांच्या बँक खात्यात पैसे जमवायचे आहेत.माजी आ. दिनकर पाटील, उमेश देशमुख, महेश खराडे यांनी शक्तिपीठ रद्दचा प्रस्ताव मेळाव्यात ठेवला. सर्व शेतकऱ्यांनी हात उंचावून शक्तिपीठ रद्दच्या ठरावास मंजुरी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी