शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी ८ हजार २७२ कोटींचा अहवाल मंजूर, पूर्णत्वाचा मार्ग मोकळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 11:29 IST

ताकारी योजनेचे २७ हजार हेक्टर तर मूळ आणि विस्तारित म्हैसाळ योजनेचे एकंदरीत ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

प्रताप महाडिक कडेगाव : ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प योजनेसाठी ८ हजार २७२ कोटी ३६ लाख  इतक्या किंमतीच्या पाचव्या  सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये प्रत्यक्ष कामासाठी रुपये ७ हजार ५०९ कोटी तर अनुषंगीक खर्चासाठी  ७६२ कोटींचा समावेश आहे. दोन्ही योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद असून योजनांच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे.कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प जि. सांगली या प्रकल्पाच्या जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सन २०२१-२२ च्या दरसूचीवर आधारित ही मान्यता देण्यात आली आहे. रविवार दि. १८ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झाला होता. गुरुवार दि. २९ डिसेंबर रोजी या शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागाने अध्यादेश काढला आहे.कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ स्तरावर कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत ताकारी म्हैसाळ योजनेच्या कामांसाठी दि. २ ऑगस्ट २०१७ रोजी  सन २०१३-१४ दरसुचीवर आधारीत रुपये ४ हजार ९५९  कोटी किमतीच्या चतुर्थ सुधारित अहवालास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.मात्र आता  दरसूचीतील बदलामुळे झालेली वाढ, जास्त दराची निविदा स्विकृती, भुसंपादनाच्या किंमतीतील वाढ,  नविन भुसंपादन कायद्यामुळे भूसंपादनाच्या किमतीत झालेली वाढ, संकल्पचित्रातील बदलामुळे झालेली वाढ, अपुऱ्या तरतूदीमुळे झालेली वाढ व इतर अनुषंगीक खर्चामुळे प्रकल्प किंमतीत वाढ झाली. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाने पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.यावर मंत्रीमंडळाने आवश्यक ती कार्यवाही करून दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत ताकारी व म्हैसाळ सिंचन योजनेचे  काम पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सन २०२१-२२ च्या दरसूचीवर आधारीत रुपये ८२७२.३६ कोटी किमंतीच्या पाचव्या सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे दोन्ही योजनेच्या लाभक्षेत्रातील  शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ताकारी योजनेचे २७ हजार हेक्टर तर मूळ आणि विस्तारित म्हैसाळ योजनेचे एकंदरीत ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

ताकारीला १३२२ कोटींची मंजुरी पाचव्या सुधारित प्रशासकीय अहवालातील  ८ हजार २७२ कोटी ३६ लाख इतक्या अंदाजित प्रकल्प खर्चापैकी केवळ  ताकारी योजनेसाठी १३२२ कोटींची मंजुरी मिळाली आहे. ताकारी योजनेसाठी आजवर  ९५० कोटी रुपये इतका खर्च झाला.अजूनही ३७२ कोटी रुपये इतका निधी योजनेच्या पूर्णत्वासाठी मिळणार आहे.

म्हैसाळला ६ हजार ९५९ कोटींची मंजुरी पाचव्या सुधारित अहवालानुसार म्हैसाळ योजनेसाठी ६ हजार ९५९ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च मंजूर झाला आहे.मुळ म्हैसाळ  योजनेसाठी आजवर ३ हजार ४५९ कोटी इतका  खर्च झाला आहे.आता मूळ योजनेसाठी १ हजार कोटी तर विस्तारित योजनेसाठी २ हजार ५०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी