शिराळा तालुक्यात ७६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:39+5:302021-06-23T04:18:39+5:30

शिराळा : तालुक्यात मंगळवारी २९ गावामध्ये ७६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने आराेग्य यंत्रणेला ...

76 patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात ७६ रुग्ण

शिराळा तालुक्यात ७६ रुग्ण

शिराळा : तालुक्यात मंगळवारी २९ गावामध्ये ७६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने आराेग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. शिराळा, मांगले, सांगाव, वाकुर्डे बुद्रुक हॉटस्पॉट गावे झाली आहेत. मंगळवारी मांगले, वाकुर्डे बुद्रुक येथे प्रत्येकी ९, शिराळा येथे ७, चिखली येथे ६, रिळे येथे ५, कोकरुड व सांगाव येथे प्रत्येकी ४, चिखलवाडी, ढोलेवाडी, पाडळी येथे प्रत्येकी ३, भागाईवाडी, जांभळेवाडी, कांदे येथे प्रत्येकी २ यासह २९ गावात ७६ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या एकूण ६२३ रुग्ण उपचाराखाली आहेत. गृह विलगीकरणात ५४४ रुग्ण उपचार घेत असून, संस्थात्मक विलगीकरण कक्षात ८, उपजिल्हा रुग्णालयात ३९, कोकरुड ग्रामीण रुग्णालयात १९, खासगी रुग्णालयात १२, स्वस्तिक कोविड सेंटर येथे १ असे रुग्ण दाखल आहेत.

Web Title: 76 patients in Shirala taluka