शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

TET Exam: सांगली जिल्ह्यात टीईटी परीक्षेला ७४५ विद्यार्थ्यांची दांडी, कडक बंदोबस्तात झाली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:29 IST

टीईटी परीक्षाचे संपूर्ण कामकाज व्हिडीओ रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पारदर्शकपणे पार पडले

सांगली : जिल्ह्यामध्ये रविवारी टीईटी परीक्षा २७ केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्तात सुरळीतपणे आणि कोणताही अनुचित प्रकार न होता पार पडली. पेपर १ साठी ५ हजार ४४ विद्यार्थी नोंद झाले होते, त्यापैकी ४७२० विद्यार्थी हजर होते. तर ३२४ विद्यार्थी गैरहजर राहिले. पेपर २ साठी ७ हजार १९९ विद्यार्थी नोंद असताना प्रत्यक्षात ६७७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४२१ विद्यार्थी गैरहजर राहिले. एकूण ७४५ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणेचा वॉच होता. टीईटी परीक्षेबाबत जिल्हा संनियंत्रण कक्ष स्थापन केला होता. तसेच प्रत्येक भरारी पथकात एक महिला कर्मचाऱ्याचा समावेश केला होता. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थी (दिव्यांग उमेदवारांच्या लेखनिकासह) यांचे मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने फिकिंग करूनच त्यांना पुढे प्रवेश देण्यात आला.परीक्षा कामकाजात कोणतीही दिरंगाई होऊ नये, तसेच परीक्षा कालावधीत गोपनीयता आणि सुरक्षेची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. परीक्षा झाल्यानंतर परीक्षा साहित्य जिल्हास्तरावर काळजीपूर्वक जमा करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी काकडे यांनी दिल्या होत्या. या सूचनेचे परीक्षा केंद्रांवर काटेकोरपणे पालन करण्यात आले. टीईटी परीक्षा २०२५ चे संपूर्ण कामकाज व्हिडीओ रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पारदर्शकपणे पार पडले.

जिल्ह्यातील २७ केंद्रांवर टीईटी परीक्षा झाली. सुरळीतपणे तसेच कोणताही अनुचित प्रकार न होता पार पडली. जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व्यवस्थितपणे पार पडली. उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्यासह शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना तसेच डायट यांच्या भरारी पथकाने परीक्षा केंद्रांवर भेटी देऊन पाहणी केली. - मोहन गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : TET Exam: 745 Students Absent in Sangli, Exam Held Securely

Web Summary : Sangli's TET exam saw 745 absentees across 27 centers. Strict security, CCTV surveillance, and flying squads ensured smooth, fair execution, following collector's instructions. Metal detectors screened entrants for transparency.