शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पोलिसांच्या सबसिडीअर कॅन्टीनमध्ये ७४ लाखांचा अपहार, हवालदाराविरुद्ध गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:14 IST

कॅश इन हॅन्ड आणि नफ्यात तफावत आढळली

सांगली : जिल्ह्यातील पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी सुरू केलेल्या ‘संस्कृती सबसिडीअर कॅन्टीन’मध्ये ७४ लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत कॅन्टीन व्यवस्थापक, हवालदार भूपेश चांदणे याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कल्याण शाखेचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.तत्कालीन पोलिस अधिक्षक दिलीप सावंत यांनी साधारण दहा वर्षांपूर्वी पोलिसांसाठी कॅन्टीन सुरू केले होते. कॅन्टीनमध्ये स्वस्तात किराणा माल व वेगवेगळ्या वस्तू विक्री होत होत्या. त्यामुळे कॅन्टीनला चांगला प्रतिसाद मिळत होता. किराणा मालासह वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स वस्तूंची देखील विक्री होत होती. कॅन्टीनचा व्यवस्थापक असलेल्या हवालदार चांदणे याने साधारणपणे तीन वर्षांपासून कॅन्टीनमध्ये गैरव्यवहार सुरू केला.

लेखापरीक्षक विश्वेश देशपांडे ॲन्ड कंपनीने एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या वर्षाचे लेखापरीक्षण केले. तेव्हा सुपरवायझर अकाऊंट कॅश आणि नफ्यात १९ लाख ८० हजारांची तफावत आढळली. स्टॉकमधील तफावत ४ लाख ४८ हजार रूपये, सुपरवायझर डेटर्समध्ये २० लाख ८० हजार रूपये अशी एका वर्षात ४५ लाख ८ हजार ७५५ रूपयांची तफावत आढळली. एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षात २८ लाख ९४ हजार ८१२ रूपयांची तफावत आढळून आली. दोन वर्षांत ७४ लाख ३ हजार ५६७ रूपयांची तफावत आढळल्याबाबत लेखापरीक्षक देशपांडे यांनी अहवाल पोलिस कल्याण विभाग, संशयित व्यवस्थापक चांदणे यांना दिला.पोलिस कल्याणचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी हा अहवाल पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला. अधीक्षक घुगे यांनी ३० मे २०२५ रोजी याबाबत चौकशीचे आदेश दिले. आर्थिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अरूण सुगावकर यांची नियुक्ती केली. त्यांनी १८ जून २०२५ रोजी अधीक्षक घुगे यांना अहवाल सादर केला. अधीक्षक घुगे यांनी व्यवस्थापक चांदणेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक कांबळे यांनी गुरूवारी रात्री संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चांदणे याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

कॅन्टीनला अखेर टाळेभूपेश चांदणे याने केलेल्या अपहारानंतर चौकशीदरम्यान कॅन्टीनला टाळे ठोकण्यात आले आहे. दिवाळीत कॅन्टीन सुरू होईल या आशेने अनेकजण हेलपाटे मारत होते. परंतु कॅन्टीन बंदमुळे अनेकांची निराशा झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Police Canteen Embezzlement: ₹7.4 Million Fraud, Constable Booked

Web Summary : A ₹7.4 million fraud was discovered at Sangli's police subsidized canteen. Constable Bhupesh Chandane, the canteen manager, has been booked. An audit revealed discrepancies over two years, leading to the canteen's closure and a police investigation.